बागलकोट - कर्नाटकातील चेरुडी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये मंगळवारी एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे. रायचुर जिल्ह्यातील मस्की गावामध्ये राहणाऱ्या नेत्रा अमरेश गुरन (वय २५), असे महिलेने या तीन मुलांना एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला. ही तीनही मुले निरोगी आणि सुदृढ आहेत. तसेच महिलेची प्रकृतीदेखील स्थिर आहे.
![woman gave birth to triplets all infants are healthy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3928426_thumbnail_3x2_sow_2407newsroom_1563940783_739.jpg)
चेरुडी हॉस्पिटलच्या डॉ. अनुसुया चेरुडी आणि डॉ. जयाप्रदा नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या बाळाचे वजन १.६ किलो, दुसऱ्या बाळाचे वजन १.८ किलो आणि तिसऱ्या बाळाचे वजन १.१ किलो आहे.