गांडेय/गिरिडीह (झारखंड) - मुंबईतील रहिवासी असलेली एक विवाहिता तिच्या पतीच्या शोधात गांडेयमधील तिसरी येथील लोकाय येथे पोहोचली. तिसरी येथील तिच्या सासरी फोन केल्यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याचे तिला समजले. तिच्या पतीने 17 ऑगस्टला दुसऱ्या मुलीशी लग्न केले असून तो तिच्यासेबत फरार झाल्याचे समोर आले आहे. पतीने दुसरे लग्न केल्याचे समजताच संबंधित विवाहितेने तिच्या सासरच्या घरी धाव घेत जोरदार वादावादी केली. यानंतर तिच्या नातेवाईकांसह तिने लोकाय नायनपूर पोलीस ठाणे गाठत न्यायाची मागणी केली.
घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणाऱ्या पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला - गिरिडीह मुस्लीम महिला हुंडाबळी
पतीच्या मागण्या पूर्ण करण्यास आपल्या कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खुशीने केला आहे. घरगुती हिंसेला कंटाळून तिने 2 सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदवली. लॉकडाऊन लागू झाल्याच्या सुमारास समीर अन्सारी मुंबईहून त्याचे गाव लोकाय येथे आला होता. येथे त्याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर खुशीने न्यायासाठी आवाज उठवला आहे.