जयपूर - राजस्थानमधील कोटा शहरात एका महिलेची धावत्या बसमध्येच प्रसूती झाली. त्यानंतर महिलेला जे. के लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनवेळेला आशा सेविका मदतीला धावल्यामुळे पुढील अनर्थ टळला. महिला आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरातली घटोत्कच परिसरात आशा सेविकांना बसमधून घेऊन जात असताना चालकाला रस्त्याच्या बाजूला एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चालकाने बस थांबविली. यावेळी गाडीतील आशा सेविकांनी तत्काळ महिलेला बसमध्ये बसविले. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच महिलेची प्रसूती झाली.
आशा कार्यकर्त्या कोरोना तपासणीसाठी शहरातील विविध भागांना भेटी देत आहेत. त्यांना जाण्या-येण्यासाठी प्रशासनाने बसची व्यवस्था केली आहे. या आशा सेविकांमुळे महिलेची प्रसूती व्यवस्थित झाली आणि पुढील अनर्थ टळला.