ETV Bharat / bharat

चिंताजनक... कोविड रुग्ण संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझीलपेक्षाही जास्त बाधित - india corona live news

पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तेथे ६० लाखांपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 6, 2020, 3:21 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशामध्ये एकूण रुग्णांची संख्या ४१ लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये ४० लाख ४१ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तेथे ६० लाखांपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ७० हजार ६२६ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ४१ लाख १३ हजार ८१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ६२ हजार ३२० रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६६ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात ७० हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानुसार देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७७.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यासोबतच देशातील मृत्यूदरही कमी झाला असून, १.७३ टक्क्यांवर झाला आहे.

सद्य स्थितीत भारतात प्रत्येक दिवशी १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्येही जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनामुळे भारतापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करता इतर देशात भारतापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.