नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील थंडीने गेल्या 11 वर्षांचा रेकार्ड मोडला आहे. सकाळी तापमानाचा पारा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मंगळवारी सर्वाधिक न्यूनतम तापमान 13.7 डिग्री सेल्सिअस तर अधिकतम तापमान 33.8 डिग्री सेल्सियस नोंद झाले आहे. या दिवसात गेल्या 11 वर्षांनंतर इतकी थंडी पडली आहे. दिल्लीकरांना वेळेअगोदरच थंडीची चाहूल लागली आहे.
2009 मध्ये 13.4 सर्वाधिक न्यूनतम डिग्री तापमानाची नोंद झाली होती. यावर्षीही 15-15 डिग्री तापमान राहण्याचा अंदाज होता. यंदा कडाक्याची थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच 21 ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये प्रदुषणाची समस्या वाढू शकते, असेही हवामान विभागाने म्हटलं आहे.