बेळगाव (कर्नाटक) - अनैतिक संबंधाबद्दल विचारणा केल्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने पतीचा खून केला. ही घटना 3 सप्टेंबरला रात्री घडली. म्हशीचा मृतदेह असल्याचे सांगत जेसीबीद्वारे खड्डा करून अंधाराचा फायदा घेत पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यामधील हंचिनाळ येथील आहे.
सचिन आणि अनिता या पती-पत्नी दरम्यान वारंवार वाद होत होते. 3 सप्टेंबरला सचिनने अनिताला अनैतिक संबंधाबाबत प्रश्न विचारले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. यावेळी अनिता हिने सचिनला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा खून केला. यानंतर रात्री म्हशीचा मृतदेह पुरायचा असल्याचे सांगून जेसीबीद्वारे खड्डा करून त्यात सचिनचा मृतदेह पुरला. अनिताला यामध्ये तिचा भाऊ, बहिण यांच्यासह आणखी एका व्यक्तीने मदत केली.
हेही वाचा-सुशांतसिंह प्रकरण : आज बंटी सचदेव व रुग्णवाहिकेच्या चालकाची चौकशी, मीतू सिंहही हजर
निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस 4 संशयितांना शोधत आहेत.