ETV Bharat / bharat

कोविड-१९ महामारीवर नियंत्रण-साधे सोपे का नाही - भारतीयांच्या सवयी आणि कोरोना

रुमालाने तुमचे नाक आणि तोंड झाका, थुंकू नका, सातत्याने २० सेकंदपर्यंत हात धुवा, तुमचे डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्ष करू नका, हात मिळवू नका-नमस्ते करा, सामाजिक अतंर राखा-दुसऱ्यांपासून १ मिटर लांब रहा. हे सर्व साधे उपाय आहेत...पण साध्या गोष्टी आयुष्यात करायला सहज नसतात.

why-is-it-hard-to-face-covid-19-outbreak-in-india
कोविड-१९ महामारीवर नियंत्रण-साधे सोपे का नाही
author img

By

Published : Mar 27, 2020, 3:03 PM IST

कोविड-१९ महामारीमध्ये जे करायचे आहे ते प्रसार रोखणे इतकेच असून इतके साधे ते आहे. आतापर्यंत लाखो वेळेला त्याची पुनरावृत्ती केली गेली असेल. रुमालाने तुमचे नाक आणि तोंड झाका, थुंकू नका, सातत्याने २० सेकंदपर्यंत हात धुवा, तुमचे डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्ष करू नका, हात मिळवू नका-नमस्ते करा, सामाजिक अतंर राखा-दुसऱ्यांपासून १ मीटर लांब रहा. हे सर्व साधे उपाय आहेत जे १९१८ च्या फ्ल्यूच्या महामारीच्या काळापासून माहित आहेत-त्यात नवीन काहीच नाही-काहीच गुंतागुंतीचे नाही, खर्चिकही काही नाही...पण साध्या गोष्टी आयुष्यात करायला सहज नसतात. का??

इतकी मोठी महामारी सुरू असताना, माध्यमे, मोबाईल रिंगटोन्स आणि नेते त्याबद्दल गेल्या महिनाभरापासून सांगत आहेत आणि तरीही रुग्ण आणि मृतांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत, जेव्हा आपण लोकांचे वर्तन पहातो, तेव्हा त्यात फार काहीच बदल झालेला दिसत नाही. लोक अजूनही चेहरा न झाकताच खुलेपणाने खोकत असतात, रस्त्यावर थुंकतात, चेहरा आणि नाक खाजवतात, रांगेत उभे राहतात, हात मिळवतात आणि मिठीही मारतात. संसर्गग्रस्त देशांतून आलेले लोक पार्ट्यांना हजेरी लावतात आणि आनंद लुटतात. ...हे का घडते आहे? आणि हे बदलण्यासाठी काय करण्याची गरज आहे.

सहज दिसणारा वर्तनाचा नमुना बदलणे सोपे का नाही, याची अनेक कारणे आहेत. पहिले, ही वर्तनाची पद्धती दिर्घकाळापासून चालत आलेली आहे आणि हात मिळवणे, मिठी मारणे स्थानिक संस्कृतीचा भाग आहे. हे शिकवले गेलेले वर्तन आहे जे आनंद देते आणि प्रेमळपणा किंवा मैत्रीपूर्णतेची भावना निर्माण करते. खोकला, शिंक, थुंकणे हे आमच्या जैविक आणि शिकवल्या गेलेल्या वर्तनाचा भाग आहे. तो सवयीचा भाग आहे-आणि सवयी किंवा शिक्षित वर्तन बदलणे अजिबात सोपे नाही. कितीतरी संबंधित कृती या जास्त विचार न करता उलट प्रतिक्रिया म्हणून आलेले वर्तन असते.

दुसरे, आरोग्य मानसशास्त्रात अशी कल्पना आहे की प्रत्येकाचा आजार किंवा वाईट गोष्टी या सहसा जनतेला किंवा इतरांना होत असतात, मला किंवा माझ्या कुटुंबाला नाही, असा विश्वास असतो. म्हणून मी सल्ला ऐकू शकतो,अगदी इतरांना सल्ला देऊही शकतो आणि तो खरोखरच सत्य आणि उपयुक्त आहे पण मला त्यावर अमल करण्याची गरज नाही, असे मनात कुठेतरी वाटत असते. त्यामुळे आम्ही आमच्या सवयी आमच्यासाठी बदलण्याचा निर्णय घेण्याचा त्रास करून घेत नाही.

तिसरे, अनेक सहजसोप्या गोष्टी सहजपणे उपलब्ध नसतात. पाणी आणि साबण घेऊन २० सेकंद वारंवार हात धुवा, या सल्ल्याचे उदाहरण घ्या. भारतात अनेक ठिकाणी-रस्ते, सरकारी कार्यालयांसह इतर कार्यालये, रेल्वे आणि बस स्थानक, शाळा आणि महाविद्यालये, अगदी रेस्टॉरंटसमध्ये स्वच्छतागृह आणि हात धुण्याच्या सुविधा अस्तित्वात नाहीत, त्या काम करत नाहीत, पाणी किंवा साबण नाही किंवा अत्यंत भयानक अवस्थेत आहेत. अनेक घरांमध्ये फार कमी पाणी असते आणि प्रवाही पाणी तर नसतेच तसेच साबणही फार कमी असतो. आणि अंतिमतः २० सेकंद हा तुम्ही घड्याळ लावून पाहिले तर खूप दिर्घ कालावधी आहे. माझा अगदी कच्चा अंदाज असा आहे की जर शल्यविशारद आणि ओसीडीचे लोक वगळले तर अगदी १ टक्का लोकसंख्याही ते करत नसणार. साधारणपणे ५ ते ७ सेकंदात हात धुऊन होतो. म्हणून २० सेकंद हात धुवा, म्हणणे खूप सोपे आहे पण करायला खूप अवघड आहे.

आता डोळे, नाक आणि तोंड किंवा चेहऱ्याला स्पर्ष करणे ही आमच्या सवयी, शैली आणि कधीकधी जैविक गरजांचा भाग आहे. गेला एक महिना साथीचा रोग सुरू झाल्यापासून, या संदर्भात मी माझ्या आणि अनेक अत्यंत उच्चशिक्षित व्यावसायिक ज्यांच्याबरोबर मला अनेक बैठका करण्याची संधी मिळाली त्यांच्या वर्तनाचे निरिक्षण करत आहे. त्या सर्वांमध्ये मी वारंवार डोळे, नाक किंवा चेहर्याला हात लावण्याची सवय पहात आहे. हे पुन्हा सवयीचा भाग आहे किंवा नाक, डोळे चुरचुरू लागले किंवा कंटाळा किंवा झोप घालवण्याची उलट क्रिया आहे. या सवयी बदलणे खूप अवघड आहे. त्यापैकी काही पिढ्यानपिढ्या विकसित झाल्या असल्या पाहिजेत आणि आमचे डोळे, नाक आणि तोंड संरक्षित आणि कार्यरत ठेवण्यासाठी उत्क्रांतिच्या जीवशास्त्रात रूतवल्या गेल्या असतील.

गर्दी करणे, एकमेकांच्या अंगावर पडणे ही कदाचित आमच्या लोकसंख्येच्या घनतेतून आले असणार, आमच्या अपात्र आणि बेशिस्त देशात रांगेत उभे राहिल्याने उद्देश्य साध्य होण्याची अनिश्चितता किंवा आमच्या जैविक गरजा ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो त्यांच्या अगदी जवळ राहण्याच्या असतील. मोठी संमेलने भरवून-मग ती सामाजिक, व्यापारी किंवा राजकीय असोत, भारतीयांना साजरे करायला आणि देखावा करायला आवडते-आमचा विश्वास हा आहे की आकडे आमची मजबुती आहे. राष्ट्र म्हणून अगोदर कल्पना देऊन भेट घेणे यावर आमचा विश्वास असल्याचे दिसत नाही- अगदी एखादे सार्वजनिक कार्यालय आणि अनेक खासगी कार्यालये अपॉइंटमेंट पद्धतीने काम करत असतील. कोणतीही सेवा मिळवण्यासाठी आम्हाला रांगेत आणि गर्दीत उभे रहावे लागते. आणि अगदी किमान सांगायचे तर आमची रांगेची शिस्त आणि रांगेतील न्यायाची जाणीव ही अत्यंत सुमार आहे. पुन्हा हे बदलणे मुळीच सोपे नाही. प्रमुख धोरणात्मक सुधारणा आणि मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. आम्हाला विकेंद्रित आणि लोकशाहीवादी व्हावे लागेल आणि सेवांचा पुरवठा वाढवावा लागेल ज्यामुळे गर्दी करण्याची गरज लागणार नाही.

सवयी बदलण्याला शिक्षण, माहिती आणि संपर्काची गरज आहे-पण ते पुरेसे नाही. त्याला सातत्याने सरावाची गरज आहे-प्रात्यक्षिक. अगदी अलिकडे एक चांगले उदाहरण आहे. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक बागांमध्ये लोक एकत्र येतात आणि हास्यक्लब चालवतात. ते एकत्र येऊन सराव करतात-कृत्रिम हसण्याचा- जसे ड्रिल शिक्षक ड्रिलला आदेश देत असतो अगदी त्याचप्रमाणे-हास्यक्लबचा समन्वयक प्रत्येकाला हसण्याच्या कलेचा सराव देतो. या सवयी बदलण्यासाठी,आम्हाला अगदी तसे केले पाहिजे-लोकांना अगदी प्रात्यक्षिकाप्रमाणे हाताचा कोपरा तोंडाजवळ नेऊन किंवा एखाद्या रूमालात खोकायला सांगितले पाहिजे, नाक किंवा डोळे रूमालाने चोळले पाहिजेत. एक मिटर लांब अंतरावर थांबण्याची आणि हस्तांदोलन न करता किंवा मिठी न मारता भेटण्याची ड्रिल आम्हाला केली पाहिजे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांचा भाग म्हणून आम्हाला सार्वजनिक आणि खासगी इमारतींमध्ये पुरेशी शौचालये आणि हात धुण्याच्या सुविधा साबण आणि पुरेशा पाण्यासह उपलब्ध आहेत, याची खात्री केली पाहिजे. इमारतींच्या संहिता बदलून त्यांना हात धुण्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला लावले पाहिजे. पाण्याच्या टाक्यांचे आदर्ष माप वाढवले पाहिजे कारण साबणाशिवाय पाण्याने दोन मिनिटे हात धुण्यापेक्षा२० सेकंद साबणाने हात वारंवार धुण्यासाठी जास्त वेळ लागतो.

शेवटी, आमच्या सामाजिक राजकीय ताकदीचे आकलन गर्दीतील आकड्यापासून दुसऱ्या एखाद्या समाधान आणि पूर्ततेच्या जाणिवेत बदलले पाहिजे. यात समाजमाध्यमे मदत करू शकतात. हे कदाचित सर्वाधिक अवघड आव्हान असेल. पंतप्रधानांच्या जनता संचारबंदीच्या प्रशंसनीय कल्पनेप्रमाणे, येथेही पुन्हा आम्ही मेळाव्यांना ३०० ते ४०० च्यावर उपस्थिती असू नये, अशी नैतिक आचारसंहिता विकसित करू शकतो आणि सामूहिक मेळाव्यांसाठी ही मर्यादा १ हजार असावी. म्हणून कोविड-१९ महामारीच्या नियंत्रणासाठी ज्या साध्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सोप्या मुळीच नाहीत. पण राष्ट्र आणि समाज म्हणून आम्ही करायचा निर्धार केला तर त्या करण्याजोग्या आहेत. या महामारीला लढा देण्यासाठी आम्हाला ते अतिशय जलद करावे लागेल.

(लेखक डॉ. दिलीप मावळणकर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, गांधीनगरचे संचालक आहेत. त्यांची मते वैयक्तिक आहेत.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.