नवी दिल्ली - हाथरसच्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून पीडितेला न्याय देण्याची मागणी होत आहे. यातच भाजपा नेते रंजीत श्रीवास्तव यांनी हाथरस प्रकरणावरून मुक्ताफळे उधळली आहेत. पीडितेचे संबधित आरोपीसोबत प्रेम प्रकरण होते. त्याला भेटण्यासाठीच ती तिथे गेली असावी. तसेच बलात्कार प्रकरणातील मृत मुली या उसाच्या व मक्याच्या शेतातच का सापडतात?, त्या गव्हाच्या शेतात का सापडत नाहीत?, असे ते म्हणाले. तथापि, भाजपा नेत्याच्या अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
This is the mind set of @BJP4India leader Ranjeet Shrivastav from Barabanki... @NCWIndia @sharmarekha would your kind office dare to book such mindset’s? pic.twitter.com/4cYUZsjBx9
— Netta D'Souza (@dnetta) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is the mind set of @BJP4India leader Ranjeet Shrivastav from Barabanki... @NCWIndia @sharmarekha would your kind office dare to book such mindset’s? pic.twitter.com/4cYUZsjBx9
— Netta D'Souza (@dnetta) October 6, 2020This is the mind set of @BJP4India leader Ranjeet Shrivastav from Barabanki... @NCWIndia @sharmarekha would your kind office dare to book such mindset’s? pic.twitter.com/4cYUZsjBx9
— Netta D'Souza (@dnetta) October 6, 2020
मुलीने प्रेमसंबंधांतूनच मुलाला बाजऱ्याच्या शेतात भेटण्यासाठी बोलावले असेल, तेव्हाच कोणीतरी त्यांना रंगेहात पकडले असेल. अशा बलात्कार प्रकरणात ज्या मुली मरतात. त्या अशा विशिष्ट ठिकाणीच सापडतात. या मुली उसाच्या, मक्याच्या शेतात किंवा जंगलात, गटारात आढळतात. या मुली गव्हाच्या शेतात का आढळत नाहीत? त्यांना फरफटत नेताना कोणी पाहत नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकारने अशा प्रकरणातील मुलींना नुकसान भरपाई देऊ नये, अशी माझी सरकारकडे विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.
हाथरस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही मुलांना सोडून द्यायला हवे. मी खात्रीने सांगतो की, ही चारही मुले निर्दोष आहेत. त्यांना तुरुंगातून वेळेवर सोडले नाही. तर, मानसिक छळाला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.
यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुलींवर चांगले संस्कार नसल्यामुळेच बलात्कार होत असल्याचे म्हटले होते. रामराज्य उत्तर प्रदेशात असल्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचे कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणे, हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले होते.