नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये महामारी पसरली आहे. या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सोशल मीडिया जायंट व्हॉट्सअॅपची मदत घेतली आहे. डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना व्हॉट्सअॅपच्या मदतीने नागरिकांना हेल्थ अलर्ट पाठवत आहे. या सुविधेद्वारे तब्बल दिडशे कोटी नागरिकांना कोरोनाबाबतची अधिकृत माहिती मिळणार आहे.
कोरोना जगभरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अनेक प्रकारची खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरत आहे. त्यातून नागरिकांध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरत असून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खरी माहिती मिळावी म्हणून डब्ल्यूएचओने व्हॉट्सअॅपची मदत घेतली आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे सरकारी अधिकाऱ्यांसह नागरिकांना अद्यावत आकडेवीर, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास न ठेवण्यासाठी संदेश जारी करण्यात येणार आहेत.
कसे मिळवाल व्हॉट्सअॅप संदेश
'+41 79 893 1892' हा क्रमांक आपल्या मोबाईमध्ये सेव्ह करावा. त्यानंतर फक्त 'Hi' असा संदेश पाठवल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर हवी ती माहीती मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
WHO Health Alert brings COVID-19 facts to billions via WhatsApp 👉https://t.co/NiHHv2gzhU pic.twitter.com/uiDbPTHKZa
— World Health Organization (WHO) (@WHO) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WHO Health Alert brings COVID-19 facts to billions via WhatsApp 👉https://t.co/NiHHv2gzhU pic.twitter.com/uiDbPTHKZa
— World Health Organization (WHO) (@WHO) March 20, 2020WHO Health Alert brings COVID-19 facts to billions via WhatsApp 👉https://t.co/NiHHv2gzhU pic.twitter.com/uiDbPTHKZa
— World Health Organization (WHO) (@WHO) March 20, 2020