जगातील सर्वात उंचावरच्या युद्धभूमीवरील ध्रुवीय प्रदेशानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिमनदीजवळ बाना या सियाचीनमधील चौकीजवळच्या कठोर प्रदेशात निसर्ग हा मानवासाठी सर्वाधिक क्रूर असतो. प्राणवायूचा तुटवडा असलेला हा वस्तुतः मृत्यूचा विभाग असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक आणि साधनसंपत्तीची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
या जागेजवळ कुठेतरी 20,000 फुटांवर, जेथे प्रचंड हिवाळी बर्फ आणि जमलेल्या बर्फाने आपली जागा सोडली आणि एक बर्फाची भिंत भारतीय लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीवर कोसळली जे नेहमीच्या गस्तीवर जात होते. सोमवारी ही घटना घडली. `जेथे गवताचे पातेही उगवत नाही', अशी ही जागा असेल पण बाना टॉप आणि त्याचा सभोवतालच्या परिसरातून साल्टरो कडा आणि सियाचीन हिमनदी यांचा स्पष्ट देखावा दिसतो आणि अशा चौकीचे डावपेचाच्या दृष्टीने महत्व काय आहे? हे लष्करी माणसाला सांगण्याची गरज नाही. शिवाय देशातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचा साठा येथे आहे. म्हणूनच 21 हजार फूट उंचीवर वसलेल्या बाना चौकीचे सुभेदार मेजर आणि मानद कप्तान बाना सिंग यांनी 26 जून 1987 रोजी पाकिस्तानी सैनिकांकडून ही चौकी रक्तरंजित लढाई करून जिंकली. त्यासाठी आपल्या छोट्या पथकासह 1500 फूट उंचीची केवळ बर्फाची भिंत चढून ते गेले होते.
प्रशिक्षित जवान, श्वानपथक, समुद्रसपाटीपासून उंचावर वापरली जाणारी उपकरणे आणि लष्करी हेलिकॉप्टर यांचा समावेश असलेले आपत्कालीन बचाव पथकाला शोध घेण्यासाठी कामाला लावण्यात आले. पण, सर्वोत्कृष्ट प्रयत्न करूनही ते निरुपयोगी ठरले. बर्फाच्या महाकाय ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्यांना बाहेर काढून त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले. मात्र, गोठवणारे तापमान आणि अतिउंचावरील भयंकर परिस्थिती यांनी त्यांचा बळी घेतला. चार लष्करी जवान आणि दोन नागरी पोर्टर यांनी आपले जीव गमावले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंगापूरच्या अधिकृत भेटीवर असताना लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी सियाचीन घटनेविषयी चर्चा केली आणि ट्विटवर शोक व्यक्त केला. सियाचीनमध्ये बर्फाची दरड कोसळल्याने झालेल्या जवान आणि पोर्टरच्या मृत्यूमुळे अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या धैर्याला आणि राष्ट्रसेवेला मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या हार्दिक संवेदना, असे त्यांनी म्हटले आहे.
फेब्रुवारी 2016 मध्ये , मद्रास तुकडीच्या 19 बटालियनचे 10 जवान सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन गाडले गेले होते. 30 फूट खोल गाडले गेलेले लांन्स नायक हनुमंतप्पा हेच केवळ चमत्कार म्हणून पाच दिवस जीवंत राहिले. पण त्यांना विमानाने राष्ट्रीय राजधानीत आणल्यानंतर दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचाही मृत्यू झाला. त्यापूर्वी एक महिना अगोदर सियाचीनमध्ये एका हिमस्खलन घटनेत चार जवानानी आपले प्राण गमावले होते.
1984 ते 2018 या 34 वर्षांच्या काळात, युद्धाशिवाय अन्य कारणांनी 869 जवानांनी जीव गमावले आहेत. 7 एप्रिल ,2012 रोजी या प्रदेशातील सर्वाधिक भीषण हिमस्खलन घटनेत, 135 पाकिस्तानी सैनिक हिमस्खलनाच्या तडाख्याने कित्येक टन बर्फ कोसळल्याने गाडले गेल्याने मरण पावले.
गेल्या ३ दशकात हिमालयातील उंचावरील प्रदेशात हिमस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत, असे मानले जाते आणि अनेक तज्ज्ञांनी जागतिक तापमान वाढीला यासाठी जबाबदार ठरवले आहे. कारण वाढते तापमान बर्फ जास्त सहजपणे बर्फ फोडू शकते आणि त्यामुळे विशेषतः हिमवादळामुळे हिमस्खलन होते.
(हा लेख संजीव के बारुआ यांनी लिहिला आहे.)
हेही वाचा : अमित शाहंनी राज्यसभेत मांडला जम्मू-काश्मीरचा लेखाजोखा; सर्व काही सुरळीत असल्याचा दावा