ETV Bharat / bharat

वेध पश्चिम बंगाल निवडणुकीचे : शुभेन्दू अधिकारींचा राजीनामा तृणमूल काँग्रेसला महाग पडणार का?

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून त्याच्या पार्श्वभूमीवर शुभेन्दू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला बसलेला मोठा राजकीय धक्का आहे. शुभेन्दू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप नेत्यांनी म्हटल्याने राजकीय चर्चा, तर्क-वितर्क लावले जात आहेत.

author img

By

Published : Nov 29, 2020, 3:46 PM IST

कोलकाता
कोलकाता

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर तृणमूलचे ज्येष्ठ मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून त्याच्या पार्श्वभूमीवर शुभेन्दू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला बसलेला मोठा राजकीय धक्का आहे. शुभेन्दू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप नेत्यांनी म्हटल्याने राजकीय चर्चा, तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शुभेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. तथापि, ते तृणमूलचे सदस्य आहेत. अधिकारी कुटुंबाचा असा दावा आहे की 40-50 विधानसभा जागा त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यांचे भाऊ व वडील दोघेही खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल दर्शवतात की टीएमसी पं. मेदनापूर आणि झारग्राममध्ये कमकुवत झाली आहे. अधिकारी यांनी पक्ष सोडला तर पूर्व मिदनापूरमध्ये पक्षाची स्थितीही खालावू शकते. भाजप याकडे एक संधी म्हणून पाहत आहे.

अधिकारी कुटुंबाचा राजकीय दबदबा

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आपली पकड गमावली आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यात तृणमूलची पकड अजूनही अबाधित आहे. हे दोन जिल्हे पश्चिम मिदनापूरच्या लगतचे जिल्हे आहेत. 2019 मध्ये पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेस शुभेंद्र आणि त्यांच्या अधिकारी कुटुंबाच्या प्रभावामुळे अखंड राहिला. शुभेंदूचे वडील आणि कांठी येथील लोकसभा सदस्य शिशीर अधिकारी हे सध्या लोकसभेत तृणमूल कॉंग्रेसचे सर्वात जुने प्रतिनिधी आहेत. शुभेंदूचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दुसरा भाऊ सौमेंदू अधिकारी कांठी महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत.

..तर तृणमूलचे भविष्य अंधकारमय होईल

बंगालच्या राजकारणात सध्या शुभेंदू यांनी राजकीय दिशा बदलली असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण अधिकारी कुटुंब त्यांचा निर्णय स्वीकारतील, असेही बोलले जात आहे. शुभेंदू यांनी पक्ष सोडल्यानंतर वडील आणि दोन भावांनी त्याच मार्गाचा अवलंब केल्यास 16 व्या विधानसभा मतदारसंघात तृणमूलचे भविष्य अंधकारमय होईल. कारण जिल्ह्यातील मतदारांच्या मोठ्या भागावर अधिकारी परिवाराचा प्रभाव अजूनही कायम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे झाल्यास नंदीग्राममधील तृणमूल कॉंग्रेसची पाळेमुळे हादरली जातील, २०११ मध्ये तृणमूलच्या भूमी चळवळीने पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांच्या डाव्या आघाडीच्या सत्ता उलटून टाकण्यात प्रमुख भूमिका त्यांनी बजावली होती. एकूणच दक्षिण बंगालमधील तृणमूलवर प्रभाव पडू शकतो.

तृणमूल कॉंग्रेसचे सरकार संपुष्टात आणण्यात मुख्य भूमिका बजावतात?

या परिस्थितीत दोन प्रश्न पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. पहिला प्रश्न असा आहे की, ममता बॅनर्जी यांच्या प्रेमळ सावलीतून बाहेर पडल्यानंतर शुभेंदू हळूहळू पश्चिम बंगालच्या राजकारणातून बाहेर पडतील का? की, पुढच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचे सरकार संपुष्टात आणण्यात मुख्य भूमिका बजावतात? मात्र, यातील दुसरी शक्यता अधिक प्रबळ असल्याचे मानले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.