कोलकाता -
बुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, तरीही खबरदारीचे उपाय म्हणून राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'बुलबुल' चक्रीवादळ अधिक तीव्र झाले आहे. बुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर या वादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर चिंता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने सरकारला आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळावरील 12 तास बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सांयकाळी 6 वाजल्यापासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. विमानाची उड्डांने थांबवण्यात आली आहेत.
ओडिशा किनारपट्टी, नजीकचा परिसर आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दळणवळ सेवा ठप्प होण्याची शक्यता असून पिकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी शक्य तेवढी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.