ETV Bharat / bharat

लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यू; 100 पाहुण्यांना कोरोनाची लागण - बिहार कोरोना अपडेट

पालीगंज येथील 100 पेक्षा जास्त जणांना विवाह समारंभामुळे कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 350 नागरिक वराच्या संपर्कात आलेले आहेत. 15 जवळच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली.

Wedding ceremony
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यू; 100 पाहुण्यांना कोरोनाची लागण
author img

By

Published : Jul 1, 2020, 3:58 PM IST

पाटणा (बिहार) - ग्रामीण पाटण्यामधीव पालीगंज येथे मोठ्या संख्येमध्ये विवाह पार पडला. मात्र, यामुळे कोरोनाची मोठी साखळी तयार झाली आहे. लग्नाच्या दिवशी म्हणजेच 15 जून रोजी वराला तीव्र तापेसारखे कोरोनाचे लक्षण असतानाही नातेवाईकांनी लग्नकार्य उरकून घेतले. मात्र, दोनच दिवसांमध्ये वराचा मृत्यू झाला. वराची कोरोना चाचणी झाली नसली तरी त्याला कोरोनाच झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यू; 100 पाहुण्यांना कोरोनाची लागण

पालीगंज येथील 100 पेक्षा जास्त जणांना विवाह समारंभामुळे कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 350 नागरिक वराच्या संपर्कात आलेले आहेत. 15 जवळच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली असून, लग्नामध्ये जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिहार राज्यामध्ये कोरोनाची आतापर्यंत सर्वात मोठी साखळी असल्याचे समोर आले आहे.

वर मुलगा हा हरयाणा येथील गुरुग्राम येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कुंकू टिळ्याचा सोहळा पार पडला होता. तेव्हापासूनच त्याच्यामध्ये कोरोनाचे लक्षण जाणवत होते.

15 जून या दिवशी मुलाचा विवाह सोहळा होता. त्या दिवशी वराला तीव्र ताप आला. मात्र, विवाह उरकून घ्यावा म्हणून, नातेवाईकांनी ताप कमी होण्याची गोळी दिली. त्यानंतर लग्नकार्य उरकून घेतले. 17 जूनला वराची प्रकृती फारच खालावली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला पाटण्यातील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. मात्र, वाटेतच वराचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.