नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर राजकीय व्यक्ती, पक्ष यांच्यावरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपल्याला रोज बघायला मिळत आहेत. किंबहुना या लगबगीत एका महिलेवर मात्र सगळीकडून स्तुतीसुमनं उधळली जाताना दिसत आहेत. पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी, तसाच मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज आणि गळ्यात निवडणूक अधिकाऱ्याचं ओळखपत्र घालून हातात मतदान साहित्य घेऊन जातानाचे या महिलेचे फोटो सध्या इंटरनेट सेंसेशन ठरत आहेत.
सोशल मीडियावरील दाव्यानुसार, ही महिला तैनात असलेल्या केंद्रावरील मतदानाचा ट्क्का वाढल्याच्या चर्चा आहेत. या महिला अधिकाऱ्याविषयी अद्याप खरी माहिती समोर आली नाही. सतत व्हायरल होणाऱ्या फोटो नंतरही महिलेकडून कुठलाही खुलासा करण्यात आला नाही.
काहींच्या मते महिला मध्य प्रदेशच्या केंद्रावर तैनात होती, तर काहींच्या मते ती राजस्थान केंद्रावर कार्य बजावत होती. काहींचे म्हणणे आहे. की महिलेचे नाव नलिनी सिंह आहे, तर काहींनी ही महिला उत्तर प्रदेशची असून तिचे नाव रीना द्विवेदी असल्याचा दावा केला आहे.
महिलेची खरी ओळख अद्याप समोर आली नसली तरी सगळीकडे हे फोटो व्हायर झाले आहेत. ही महिला नेमकी कोण हे कळो वा न कळो मात्र तिचा ड्रेसिंग सेन्स व मनमोहक अदांनी नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे, एवढे मात्र नक्की.