नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकाच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज ९७९ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये कैद झाले. उत्तर प्रदेश -१४, हरियाणा -१०, बिहार -८, मध्यप्रदेश-८, पश्चिम बंगाल -८, नवी दिल्लीतील ७ जागांचा समावेश आहे. सुमारे १ लाख मतदान केंद्रांवर प्रक्रिया राबविण्यात आली.
Live Updates :
०८.१५ PM - रात्री आठ वाजेपर्यंत एकूण ६२.२७% मतदान झाले. पश्चिम बंगाल- ८०.१६ % दिल्ली - ५८.०१ %, हरियाणा - ६५.४८ %, उत्तर प्रदेश - ५४.२४ %, बिहार - ५९.२९ %, झारखंड - ६४.५० %, मध्य प्रदेश - ६२.०६ %.
०७.१५ PM - सहाव्या टप्प्यासाठी सायंकाळी सातवाजेपर्यंत एकूण ६१.१४% मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१६ % मतदान झाले. दिल्ली - ५६.११ %, हरियाणा - ६२.९१ %, उत्तर प्रदेश - ५३.३७ %, बिहार - ५९.२९ %, झारखंड - ६४.४६ %, मध्य प्रदेश - ६०.१२ %
०६.३० PM - पश्चिम बंगाल - ८०.१३ %, दिल्ली - ५५.४४ %, हरियाणा - ६२.१४ %, उत्तर प्रदेश - ५०.८२ %, बिहार - ५५.०४ %, झारखंड - ६४.४६ %, मध्य प्रदेश - ६०.१२ %
४.४० PM - देशभरात सहाव्या टप्प्यासाठी एकूण ५०.७७ टक्के मतदान.
पश्चिम बंगाल - ७०.५१ %, दिल्ली - ४५.२४ %, हरियाणा - ५१.८६ %, उत्तर प्रदेश - ४३.२६ %, बिहार - ४४.४० %, झारखंड - ५८.०८ %, मध्य प्रदेश - ५२.७८ %
४.२५ PM - काही हिंसक घटना घडूनही बंगालमध्ये आठ जागांसाठी ७०.३१ टक्के मतदान
४.२० - बिहारमध्ये दुपारी चारवाजेपर्यंत ४९.९५ टक्के मतदान
४.१० PM - उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू आणि त्यांची पत्नी उषा यांनी दिल्ली येथील निर्माण भवन मतदान केद्रावर मतदान केले.
४.०० PM - हरियाणा येथे दुपारी तीन वाजेपर्यंत ५१.४८ टक्के मतदान झाले
१:५० PM - नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
१:२० PM - पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी 'लोकांना मतदान करण्यापासून अडवले जात आहे,' असा आरोप टीएमसी (तृणमूल काँग्रेस) नेत्यांवर केला. 'टीएमसीचे गुंड माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि मतदान केंद्रावर जाण्यापासून आम्हाला अडवले,' असे ते म्हणाले.
१२:५० PM - ऑस्टेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतातील मतदान प्रक्रिया पाहून प्रभावित झाल्याचे सांगितले. 'आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बॅलट पेपरचा (मतपत्रिकेचा) वापर करतो. व्हीव्हीपटची सुविधाही चांगली आहे. हे अत्यंत प्रेरणादायी वातावरण आहे. इतक्या साऱ्या लोकांना कशा प्रकारे मतदानाला प्रवृत्त केले जाऊ शकते? याचे उत्तर एकच आहे. निवडणूक आयोग आणि तेथील अधिकाऱ्यांचे चांगले आयोजन. ते चांगल्या प्रकारे निवडणुका घडवून आणत आहेत,' अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी व्यक्त केली.
१२:२० PM - प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट बाड्रा यांच्यासह मतदान केले. आम्ही लोकशाही, देश वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहोत, असे त्या म्हणाल्या.
११:५० AM - महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी पत्नी रोमी आणि मुलगी अमिया यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
११:३० AM - संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी गांधी यांनी दिल्लीतील निर्माण भवन येथे मतदान केले.
११:०० AM - हरियाणा येथील सोनिपत येथील काँग्रेस उमेदवार भूपिंदर सिंग हु्ड्डा आणि रोहतक येथील काँग्रेस उमेदवार दीपेंदर सिंह हुड्डा यांनी सहपरिवार मतदान केले.
१०:५० AM - दिल्लीमध्ये १११ वर्षांच्या वृद्धानेही मतदान केले.
१०:४५ AM - परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीत मतदान केले.
१०:३० AM - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदान केले.
१०:१५ AM - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. 'ही निवडणूक नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या समस्या, गब्बर सिंग टॅक्स आणि राफेल व्यवहारातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर लढली जात आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रचारात द्वेष पसरवत आहेत. तर, आम्ही प्रेमाचा प्रसार करत आहोत आणि प्रेमच जिंकेल यावर माझा विश्वास आहे,' असे ते म्हणाले.
९:५० AM - पूर्व दिल्लीतील आप उमेदवार आतिशी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि काँग्रेस उमेदवार अरविंद सिंग लव्हली यांच्या विरोधात लढत आहेत.
९:३० AM - दिल्ली भाजप अध्यक्ष आणि ईशान्य दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांनी मतदान केले. ते काँग्रेस उमेदवार शीला दिक्षित यांच्या विरोधात लढत आहेत.
९:२० AM - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मतदान केले.
९:१० AM - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मतदान केले.
९:०० AM - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला.
८:४० AM - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ईशान्य दिल्लीतील उमेदवार शीला दिक्षित यांनी मतदान केले.
८:२० AM - उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी पत्नीसह मतदान केले.
८:०० AM - माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार गौतम गंभीरने पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.
७:४५ AM - क्रिकेटपटू विराट कोहली याने मतदानाचा हक्क बजावला.
७:३० AM - भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मतदान केले.
७:१५ AM - केवळ महिलांसाठी असलेले 'पिंक पोलिंग बूथ' सज्ज.
७:०० AM - मतदान सुरू. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा