ETV Bharat / bharat

टाकाऊ प्लास्टिक द्या अन् अंडी, मिठाई घेऊन जा, आंध्रमधील महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम - no plastic use Vizianagaram

विजयनगर महानगरपालिका एक किलो प्लास्टिकच्या बदल्यात अडीचशे ग्रॅम मिठाई किंवा ६ अंडी देत आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

PLASTIC RIDE
प्लास्टिक जागृती अभियान
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:06 PM IST

Updated : Dec 10, 2019, 9:19 PM IST

अमरावती - प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे अगणित नुकसान होऊन प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत नाही. यावर आंध्रप्रदेशातील विजयनगर शहरातील महानगरपालिकेने अफलातून उपाय शोधला आहे. 'घरातील टाकाऊ प्लास्टिक घेऊन या आणि अंडी-मिठाई घेऊन जा' असा उपक्रम महानगरपालिकेने रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू केला आहे.

'टाकाऊ प्लास्टिक द्या अन अंडी मिठाई घेवून जा' उपक्रम

हेही वाचा - मर्यादा विश्वापलीकडल्या... इस्रोची अंतराळातील व्यावसायिक क्षेत्रात उडी!

या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे महानगरपालिकेकडे प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तूंचा ढीग साठायला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाला 'संकल्प' असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्लास्टिक विरोधी जन आंदोलनानेही जोर धरला आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा राज्यामध्ये बोलबाला सुरू आहे.

हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरणी १६ डिसेंबरला निकाल; भाजप आमदार कुलदीप सेनगर दोषी ठरणार?

एक किलो प्लास्टिकच्या बदल्यात महानगरपालिका अडीचशे ग्रॅम मिठाई किंवा ६ अंडी देत आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पाच महिन्यात महानगरपालिकेच्या सर्व ५ वार्डांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे.

Intro:Body:

टाकाऊ प्लास्टिक द्या अन अंडे मिठाई घेवून जा,  आंध्रप्रदेशातील महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

अमरावती - प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे अगणित नुकसान होऊन प्रदुषणात भर पडत आहे. मात्र, अनेक

ठिकाणी प्लास्टिकचा वापर काही कमी होत नाही. यावर आंध्रप्रदेशातील वैझीयमग्राम शहरातील महानगरपालिकेने अफलातून उपाय शोधला आहे. 'घरातील टाकाऊ प्लॉस्टीक घेऊन या आणि अंडे मिठाई घेऊन जा' असा उपक्रम महानगरपालिकेने रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू केला आहे.    

या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे महानगरपालिकेकडे प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तूंचा ढीग साठायला सुरूवात झाली आहे. या  उपक्रमाला 'संकल्प' असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्लास्टिक विरोधी जन आंदोलनानेही जोर धरला आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा राज्यामध्ये बोलबाला सुरू आहे.  

एक किलो प्लास्टिकच्या बदल्यात महानगरपालिका अडीचशे ग्रॅम मिठाई किंवा ६ अंडे देत आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसात मिळत आहे. पहिल्या पाच महिन्यात महानगरपालिकेच्या सर्व ५ वार्डमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 10, 2019, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.