सूरत - गुजरातमधील एका तरुणाला रस्त्यावर थुंकल्याबद्दल लोकांनी चांगलीच शिक्षा दिली. या तरुणाला लोकांनी भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
सूरत महापालिका सध्या स्वच्छतेच्या दृष्टीने कडक पावले उचलत आहे. रस्त्यावर कचरा फेकल्यास, महापालिका १०० रूपये दंड आकारते आहे. हा दंड सात दिवसांमध्ये न भरल्यास, २५० रूपये; आणि त्यानंतरही दंड न भरल्यास १००० रूपये दंड आकारण्यात येतो आहे. यादृष्टीनेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
या व्हायरल व्हिडिओला केवळ मजेसाठी पुढे न पाठवता त्यातून बोध घेतला, तर या तरुणाला मिळालेल्या शिक्षेचा चांगला परिणाम होईल.