नवी दिल्ली - निर्भया बलात्कारप्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी या दोषींपैकी विनय शर्मा या आरोपीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. शर्माचे वकील एस. पी. सिंह यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोषींची फाशीची शिक्षा लांबण्याची शक्यता आहे.
-
2012 Delhi gang-rape case: Mercy petition has been filed by convict, Vinay Sharma, before the President of India, says his lawyer AP Singh pic.twitter.com/Xuq8Vz9fN4
— ANI (@ANI) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2012 Delhi gang-rape case: Mercy petition has been filed by convict, Vinay Sharma, before the President of India, says his lawyer AP Singh pic.twitter.com/Xuq8Vz9fN4
— ANI (@ANI) January 29, 20202012 Delhi gang-rape case: Mercy petition has been filed by convict, Vinay Sharma, before the President of India, says his lawyer AP Singh pic.twitter.com/Xuq8Vz9fN4
— ANI (@ANI) January 29, 2020
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. त्यानंतर आता तिसरा दोषी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. या अर्जावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी सर्वाच्च न्यायालयाने चार पैकी एक दोषी असलेल्या मुकेश कुमार सिंह याच्या याचिकेचा फेरविचार किंवा त्यावर कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आहे.