ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री ममतांच्या राजवटीत हिंदूंचे मॉब लिंचिंग - विहिंप - पंतप्रधानांना पत्र

मॉब लिंचिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या विषयावर 49 सेलीब्रेटींनी पंतप्रधानांना पत्र लिहल्यानंतर 60 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला विरोध केला. त्यांनी सरकारच्या बाजूने दुसरे पत्र लिहिलेले होते. या मुद्द्यांवरून ईटीव्ही भारतने विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) चे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार व संयुक्त सहकारी डॉ. सुरेंद्र जैन यांच्याशी विशेष संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री ममतांच्या राजवटीतच हिंदूंचे मॉब लिंचिंग - विहिंप
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:58 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने मोठे आरोप केले आहेत. ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना परिषदेचे संयुक्त सहकारी डॉ. सुरेंद्र जैन आणि कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी ममतांवर निशाना साधला आहे.

प्रत्येक वेळी मॉब लिंचिंगला हिंदूंबरोबर जोडणे चुकीचे आहे - आलोक कुमार

विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणतात की, प्रत्येकवेळी मॉब लिंचिंगला हिंदूंबरोबर जोडणे चुकीचे आहे. आलोक कुमार म्हणाले की, अशा काही घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये हिंदूंना मारण्यात आले आहे. परंतु त्यांच्याबद्दल कधीच काहीच बोलले जात नाही.

vhp on mob lynching in west bengal
विश्व हिंदू परिषदेचे डॉ. सुरेंद्र जैन आणि आलोक कुमार

डावे सत्तेत असतानाही हिंदूंवर दबाव आणला जात होता ममता सरकारही तेच करत आहेत - डॉ. सुरेंद्र जैन

डॉ. सुरेंद्र जैन यांनी बंगालचे उदाहरण देताना सांगितले की, 'राज्यात डावे सत्तेत असतानाही हिंदूंवर दबाव आणला जात होता आणि आता ममता सरकारमध्येही त्या तेच करत आहेत. ते म्हणाले, ममतांनी हि रामची भूमी नाही हे सांगत लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील लाखो हिंदू लोक राम नवमी साजरी करण्यासाठी रस्त्यावर आले होते. श्री राम बोलल्यानंतर ममता सरकारने एका व्यक्तीला तुरूंगात ठेवले होते. आता तोच मुलगा संपूर्ण बंगालसाठी यूथ आयकॉन बनला आहे. आम्ही पश्चिम बंगालच्या ममता सरकारला आव्हान देत आहोत. ममतांनी स्वत: ला बदलले पाहिजे, अन्यथा बंगालने त्यांना बदलण्याचा संकल्प केलेला आहे.'

विश्व हिंदू परिषदेने एक मासिक सुरू केले आहे. व्हीएचपी नेत्यांनी आरोप केला आहे की मॉब लिंचिंगच्या निवडक घटनाच अधिक दाखवल्या जातात आणि असे म्हटले जाते की, अशा घटना केवळ एका विशिष्ट धर्माच्या किंवा समुदायाच्या लोकांसाठी घडत असतात. परंतु वास्तव असे नाही, विश्व हिंदू परिषद अशा सर्व घटना या मासिकाच्या विशेष अंकातून प्रकाशित करत आहेत ज्यात हिंदूंची मॉब लिंचिंगमुळे हत्या करण्यात आली होती.

Intro:Body:

मुख्यमंत्री ममतांच्या राजवटीतच हिंदूंचे मॉब लिंचिंग - विहिंप
मॉब लिंचिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या विषयावर 49 सेलीब्रेटींनी पंतप्रधानांना पत्र लिहल्यानंतर 60 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला विरोध केला. त्यांनी दुसरे पत्र लिहिलेले जे सरकारच्या बाजूने होते. या मुद्द्यांवरून ईटीव्ही भारतने विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) चे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार व संयुक्त सहकारी डॉ. सुरेंद्र जैन यांच्याशी विशेष संवाद साधला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने मोठे आरोप केले आहेत. ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना परिषदेचे संयुक्त सहकारी डॉ. सुरेंद्र जैन आणि कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी ममतांवर निशाना साधला आहे.
प्रत्येक वेळी मॉब लिंचिंगला हिंदूंबरोबर जोडणे चुकीचे आहे - आलोक कुमार 
विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणतात की, प्रत्येकवेळी मॉब लिंचिंगला  हिंदूंबरोबर जोडणे चुकीचे आहे. आलोक कुमार म्हणाले की, अशा काही घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये हिंदूंना मारण्यात आले आहे. परंतु त्यांच्याबद्दल कधीच काहीच बोलले जात नाही.
डावे सत्तेत असतानाही हिंदूंवर दबाव आणला जात होता ममता सरकारही तेच करत आहेत - डॉ. सुरेंद्र जैन
डॉ. सुरेंद्र जैन यांनी बंगालचे उदाहरण देताना सांगितले की, राज्यात डावे सत्तेत असतानाही हिंदूंवर दबाव आणला जात होता आणि आता ममता सरकारमध्येही त्या तेच करत आहेत. ते म्हणाले, ममतांनी हि रामची भूमी नाही हे सांगत लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील लाखो हिंदू लोक राम नवमी साजरी करण्यासाठी रस्त्यावर आले होते. श्री राम बोलल्यानंतर ममता सरकारने एका व्यक्तीला तुरूंगात ठेवले होते. आता तोच मुलगा संपूर्ण बंगालसाठी युथ आयकॉन बनला आहे. आम्ही पश्चिम बंगालच्या ममता सरकारला आव्हान देत आहोत. ममतांनी स्वत: ला बदलले पाहिजे, अन्यथा बंगालने त्यांना बदलण्याचा संकल्प केलेला आहे.
विश्व हिंदू परिषदेने एक मासिक सुरू केले आहे. व्हीएचपी नेत्यांनी आरोप केला आहे की मॉब लिंचिंगच्या निवडक घटनाच अधिक दाखवल्या जातात आणि असे म्हटले जाते की, अशा घटना केवळ एका विशिष्ट धर्माच्या किंवा समुदायाच्या लोकांसाठी घडत असतात. परंतु वास्तव असे नाही, विश्व हिंदू परिषद अशा सर्व घटना या  मासिकाच्या विशेष अंकातून प्रकाशित करत आहेत ज्यात हिंदूंची मॉब लिंचिंगमुळे हत्या करण्यात आली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.