गांधीनगर - अनेक राजकीय नेते राज्य सरकारने दिलेल्या सुविधांचा भरणा भरत नसल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. गुजरात राज्य सरकारच्या आंबेडकर अंत्योदय विकास महामंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या कारचे पेट्रोल बिल दोन लाख रुपये भरलेच नाही. दरम्यान, डिफॉल्टनंतर गांधीनगरच्या सेक्टर २१ मधील पेट्रोल पंप व्यवस्थापकाने अशा अनेक राजकारण्यांची ब्लॅकलिस्ट तयार केली असून, त्या सर्वांचे नावे आणि त्यांच्या कारचा क्रमांक पेट्रोल पंपावर लावला आहे. तसेच अशा लोकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना पंपावरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे, ठाकूर कोळी विकास महामंडळाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ गेल्या जानेवारीमध्ये संपला आहे. तरी तेदेखील सरकारी कारचा वापर करत आहेत. तसेच त्यांनीही पेट्रोलचे 1 लाख 50 हजार रुपयांची बिलं भरले नाहीत. त्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
गुजरात ठाकोर कोळी विकास महामंडळाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ जानेवारीमध्ये संपला असला तरी त्यांनी आपली अधिकृत कार सरकारकडे दिली नाही. 1 ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत त्यांनी सरकारी कार क्रमांक (जीजे 18 जीए 1808) च्या पेट्रोल बिलाचे 1 लाख 50 हजार रुपये भरले नसल्याचे समोर आले आहे.
आंबेडकर अंत्योदय विकास महामंडळाचे अध्यक्ष गौतम गेडिया हे भाजपच्या अनुसूचित विभाग आघाडीचे सरचिटणीस आहेत. यांनीही पेट्रोल बिल भरलेले नाही. सेक्टर 21 मधील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने पेट्रोल पंपावर नोटीस लावली आहे. तसेच गेडिया यांची कार (क्रमांक जीजे 18 जीए 2393) यात पेट्रोल भरू नये, अशा सूचना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पेट्रोल भरण्यासाठी सर्व सरकारी गाड्या गांधीनगरच्या सेक्टर 21 मधील पंपावर येत असतात. पण, त्यातील अनेकांनी या पेट्रोलचे बिल भरले नसल्यामुळे त्यांना पेट्रोल देण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच त्यांचे गाडी क्रमांकदेखील पंपावर लावले असल्याचे पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक जयंतीलाल चौहान यांनी सांगितले.