ETV Bharat / bharat

गेहलोत सरकारला वाचण्यासाठी वसुंधराराजेंची मदत; भाजप मित्रपक्षाचा दावा - हनुमान बेनिवाल न्यूज

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी भाजप नेत्या वसुंधराराजे या अशोक गेहलोत यांना मदत करत असल्याचा आरोप केला. त्यांनी याबाबत एक ट्विटर कॅम्पेन चालवले. बेनिवाल यांच्या आरोपामुळे राजस्थानातील सत्तानाट्याचा नवा अंक समोर आला आहे.

Vasundhara Raje
वसुंधराराजे
author img

By

Published : Jul 17, 2020, 8:30 AM IST

जयपूर- राजस्थानमधील सत्तानाट्याचा नवा अंक गुरुवारी समोर आला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकाला पाठिंबा देण्याबद्दल विचारणा केली, असा आरोप केला आहे. या पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी गुरुवारी #गेहलोत_वसुंधरा_गठजोड असे ट्विटर कॅम्पेन चालवले.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी '#गेहलोत_वसुंधरा_गठजोड' या हॅशटॅगने ट्विटर कॅम्पेन चालवले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी वसुंधराराजे यांनी काँग्रेस आमदारांना फोन करुन अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा देण्याबद्दल विचारणा केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये बेनिवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राजस्थान भाजपला टॅग केले आहे.

वसुंधराराजे यांनी सिक्कर आणि नागौरमधील जाट आमदारांना फोन केल्याचा आरोप देखील बेनिवाल यांनी केला. हा आरोप सिद्ध करु शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 2018 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी वसुंधराराजे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर बेनिवाल यांनी भाजप पक्ष सोडला होता.

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याबद्दल वसुंधराराजे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीला देखील त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या.

दरम्यान, गेहलोत यांच्या समर्थक आमदारांना फॅरिमोंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.