ETV Bharat / bharat

कोरोनाच्या विळख्याने काशीतील ब्राम्हण समुदाय आर्थिक संकटात

कोरोनाच्या काळात येथील धार्मिक विधीवर निर्बध आले आहेत. लॉकडाऊनचा फटका ज्या प्रमाणे छोट्या मोठ्या व्यावसायिाकांना बसला आहे. तसाच फटका येथील ब्राम्हणांनाही बसला आहे. येथील ब्राम्हण समुदाय सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पूजा अर्चनेवरच काशीतील ब्राम्हणांचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, सध्य स्थितीत पूजापाठ बंद असल्याने गरीब ब्राम्हणवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

varanasi brahmins face financial problem
काशीतील ब्राम्हण समुदाय आर्थिक संकटात
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:31 PM IST

Updated : Nov 1, 2020, 8:00 PM IST

वाराणसी - हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या काशी शहरास विद्वानांची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. मात्र, कोरोनाच्या काळात येथील धार्मिक विधीवर निर्बध आले आहेत. लॉकडाऊनचा फटका ज्या प्रमाणे छोट्या मोठ्या व्यावसायिाकांना बसला आहे. तसाच फटका येथील ब्राम्हणांनाही बसला आहे. येथील ब्राम्हण समुदाय सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र, धार्मिक विधी करून जगणाऱ्या या समुदायाकडे सराकारचे लक्ष नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

काशीतील ब्राम्हण समुदाय आर्थिक संकटात

कोरोना महामारीमुळे काशीमधील सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. सरकारने कोरोनाच्या नियमावलीचे पालन मंदिर आणि मठ सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या भीतीने भक्तांचा येणार ओघ अद्यापही तुरळकच आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक घरामध्ये पूजा पाठ करण्यासही पुढाकार घेताना दिसून येत नाहीत. या पूजा अर्चनेवरच काशीतील ब्राम्हणांचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, सध्य स्थितीत पूजापाठ बंद असल्याने गरीब ब्राम्हणवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

एकवेळच्या जेवणावरच जातो दिवस-

कोरोना काळात सुरू असलेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही कसेतरी दिवस पुढे ढकलत आहोत. सध्या केवळ एकवेळचे जेवण करण्याची वेळ आली आहे. आता कोरोना काळात आमचा कमवण्याचा काळ निघून गेला आहे. तसेच यंदा काही कमाई झाली नसल्यामुळे जवळचा पैसाही संपला आहे. त्यामुळे सध्या हलाकीचे जीवन जगण्याची वेळ आली असल्याची खंत ब्राम्हणांनी व्यक्त केली आहे

आमची सध्या सुरू असलेली अडचण आणि झालेल्या दयनीय अवस्थेकडे कोणाचे लक्ष्य नाही. निवडणुंकामध्ये सर्वांचा उल्लेख केला जातो. मात्र, आमचाही विचार करावा याबाबत कोणीही आवाज उठवत नाही. जो ब्राह्मण आपले आयुष्य कर्मकांडासाठी समर्पित करतो, तो अशा आर्थिक अडचणीत आपला वृद्धापकाळ कशा प्रकारे घालवणार अशी चिंता काही ब्राम्हणांनी व्यक्त केली आहे.

ब्राह्मणांना दक्षिणा देण्यास नागरिकांचा नकार-

काशीचे एक ब्राम्हण कमलेश म्हणाले की, नागरिक सर्व प्रकारचे खर्च करतील, मात्र, ब्राह्मणास दक्षिणा देण्याची त्यांची ईच्छा नाही. सर्वांना वाटते की ब्राह्मणांचे काम म्हणजे व्यर्थ आहे. मात्र, नागरिक जेव्हा अडचणीत येतात, तेव्हा त्यांना ब्राह्मणाची आठवण होते. त्यावेळी ते त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याची गयावया करतात.

काशीत आहेत 5 लाख ब्राह्मण-

पंडित कमलेश यांनी सांगितले की बनारसमध्ये जवळपास ५ लाख ब्राह्मण आहेत. ज्यातील अडीच लाख ब्राह्मणांनी कोव्हिड-19 मुळे येथून पळ काढला. मात्र, अजूनही जवळपास अडीच लाख ब्राह्मण काशीच्या वास्तव्याला आहेत. त्यामध्ये काही 85 वर्षाचे वृद्ध देखील आहेत. या कठीण काळात ते मोठ्या अडचणींचा सामना करत आपले दिवस काढत आहेत.

Last Updated : Nov 1, 2020, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.