ETV Bharat / bharat

वंदे भारत एक्सप्रेस वाराणसीच्या दिशेने पहिला प्रवास सुरू

वंदे भारत एक्सप्रेस वाराणसीच्या दिशेने पहिल्या व्यावसायिक प्रवासासाठी रवाना झाली आहे. ही सर्वप्रथम दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावणार आहे. २ फेब्रुवारीला प्रयागराज ते वाराणसी मार्गावर या गाडीची चाचणी घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.

वंदे भारत एक्सप्रेस
author img

By

Published : Feb 17, 2019, 3:18 PM IST

नवी दिल्ली - वंदे भारत एक्सप्रेस वाराणसीच्या दिशेने पहिल्या व्यावसायिक प्रवासासाठी रवाना झाली आहे. ही सर्वप्रथम दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावणार आहे. या रेल्वेची पुढील २ आठवड्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. 'विमानप्रवासापेक्षा महाग' अशी या रेल्वेची ओळख झाली होती. यापूर्वी २ फेब्रुवारीला प्रयागराज ते वाराणसी मार्गावर या गाडीची चाचणी घेण्यात आली होती.

१५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पहिल्या सेमी हायस्पीड एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला होता. रेल्वे मंत्री पीयुष गोयलही उपस्थित होते. यावेळी मोदी आणि गोयल यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या हल्याचे प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांसमोर आमचे जवान आणि जनता झुकणार नसल्याचेही गोयल यांनी सांगितले.

अबब! विमानापेक्षा महागडे भाडे

वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेच्या वातानुकूलित चेअर कारचे भाडे १ हजार ८५० रुपये आहे. तर, एक्झीक्युटीव्ह म्हणजेच कार्यकारी वर्गाचे भाडे ३ हजार ५२० रुपये एवढे आहे. हे भाडे सामान्य वातानुकूलित चेअर कारच्या भाड्याच्या तुलनेत दीड टक्क्यांने जास्त आहे. तर, एक्झीक्युटीव्ह श्रेणीचे भाडे सामान्य भाड्याच्या तुलनेत १.४ टक्के जास्त आहे. वंदे भारतच्या तिकीटापेक्षा विमान प्रवास स्वस्तात म्हणजेच सामान्यतः अडीच हजार रुपयात करता येतो हे वास्तव आहे.

नवी दिल्ली ते वाराणसी जाणाऱ्या प्रवाशांना एक्झीक्युटीव्ह श्रेणीमध्ये अल्पोपहारासाठी ३९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर, चेअर कारच्या प्रवाशांना ३४४ रुपये मोजावे लागतील.

undefined

वंदे भारत रेल्वेची वैशिष्ट्ये -

वंदे भारत रेल्वेमध्ये १६ डबे आहेत. त्यापैकी २ डबे हे एक्झीक्युटीव्ह श्रेणीचे आहेत. या गाडीचे सामान्य डबे हे वातानुकूलित असून चेअर कार पद्धतीचे आहेत. प्रत्येक डब्यामध्ये ७८ सीट्स आहेत. संपूर्ण रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणीबाणीच्या काळात साखळीऐवजी थेट चालकाशी संवाद करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Conclusion:

Intro:Body:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.