ETV Bharat / bharat

सिंधियांच्या मतदारसंघात पुन्हा दलिताला मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. - गुना दलित तरुण मारहाण

या व्हिडिओमध्ये काही लोक या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. एवढेच नाही, तर मारहाण केल्यानंतर जेव्हा हा तरुण बेशुद्ध झाला, तेव्हा त्या लोकांनी तरुणाच्या गळ्यात टॉवेल बांधत त्याला जमीनीवरुन फरपटतही नेले. यानंतर या तरुणाची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसताच त्याला तिथेच सोडून ते पळून गेले.

vandalism-on-dalit-again-in-scindia-region-video-goes-viral-in-guna
सिंधियांच्या मतदारसंघात पुन्हा दलिताला मारहाण; व्हिडिओ व्हायरल..
author img

By

Published : Jul 19, 2020, 3:59 PM IST

भोपाळ : गुनामधील मागासवर्गीय दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केलेले प्रकरण ताजे असतानाच, आणखी एका दलित तरुणाला मारहाण होत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. धान्य चोरी केल्याच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.

गुना शहराच्या गल्ला मंडीमध्ये ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये काही लोक या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. एवढेच नाही, तर मारहाण केल्यानंतर जेव्हा हा तरुण बेशुद्ध झाला, तेव्हा त्या लोकांनी तरुणाच्या गळ्यात टॉवेल बांधत त्याला जमीनीवर फरपटतही नेले. यानंतर या तरुणाची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसताच त्याला तिथेच सोडून ते पळून गेले.

  • सिंधिया के क्षेत्र गुना में-
    —एक और दलित के साथ बेरहमी;

    दलित को सरेआम पीटा और फिर गले में फंदा डालकर मंडी में घुमाया गया..!

    “शवराज चरम पर है”

    — MP Congress (@INCMP) July 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मारहाण झालेल्यालाच टाकले तुरुंगात..

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखळ करत त्याला तुरुंगात टाकले. तर त्याला मारहाण करणाऱ्यांवर अज्ञात म्हणून गुन्हा दाखल केला. यानंतर व्हिडिओच्या मदतीने आपण मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी गुना जिल्ह्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना पोलिसांनी एका दलित शेतकरी कुटुंबाला मारहाण केली होती. जिल्ह्यातील जगनापूर चाक येथे ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस उपनिरिक्षकासह सहा पोलिसांना निलंबीत करण्यात आले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.