ETV Bharat / bharat

तेलंगाणाचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही. हनुमंत राव 'कोरोना पॉझिटिव्ह'

तेलंगाणा राज्यामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात एकूण 3 हजार 363 कोरोनाचे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजार 503 उपचारानंतर बरे झाले आहेत.

देश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व्ही. हनुमंतराव

author img

By

Published : Jun 21, 2020, 3:59 PM IST

हैदराबाद - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तेलंगाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व्ही. हनुमंत राव यांना कोरोनीची लागण झाली आहे. राव हे 72 वर्षीय आहेत. आज (रविवारी) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

'माझ्या वाढदिवशी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चादरींचे वाटप केल्यानंतर तब्येत बिघडली. काल (शनिवार) माझी स्वॅब चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी त्यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी गरिबांना राशन, चादरी आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप केले होते. तर वाढदिवशी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मदत केली.

तेलंगाणा राज्यामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात एकूण 3 हजार 363 कोरोनाचे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजार 503 उपचारानंतर बरे झाले आहेत. 203 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. या आठवड्यात दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.