ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : तीन दलित बहिणींवर अ‌ॅसिड हल्ला; कारण अस्पष्ट

author img

By

Published : Oct 13, 2020, 12:21 PM IST

या तीनही बहिणी रात्री घराच्या छतावर झोपल्या होत्या. यावेळी रात्री एका तरुणाने छतावर चढत त्यांच्यावर अ‌ॅसिड फेकले. यामधील सर्वात मोठ्या बहिणीवर अ‌ॅसिड फेकण्यात आले होते. त्यावेळी तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या दोन्ही बहिणींवरही अ‌ॅसिड उडाले...

Uttar Pradesh: Three Dalit sisters attacked with acid in Gonda
उत्तर प्रदेश : तीन दलित बहिणींवर अ‌ॅसिड हल्ला; कारण अस्पष्ट

लखनौ : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या तीन दलित मुलींवर अ‌ॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही बहिणी रात्री घराच्या छतावर झोपल्या होत्या. यावेळी रात्री एका तरुणाने छतावर चढत त्यांच्यावर अ‌ॅसिड फेकले. यामधील सर्वात मोठ्या बहिणीवर अ‌ॅसिड फेकण्यात आले होते. त्यावेळी तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या दोन्ही बहिणींवरही अ‌ॅसिड उडाले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वात मोठी मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली आहे. या बहिणींवर अ‌ॅसिड हल्ला का करण्यात आला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्टेशन ऑफिसर सुधीर सिंह यांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा : डॉक्टर मॉब लिंचिंग प्रकरणी २५ जणांना शिक्षा; आसाम न्यायालयाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.