ETV Bharat / bharat

लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना

author img

By

Published : Nov 20, 2020, 7:19 AM IST

Updated : Nov 20, 2020, 8:46 AM IST

हे सर्व लोक शेखपूर गावातील एका लग्नसमारंभाला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता, की कित्येकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सात तरुण आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गॅस कटरच्या सहाय्याने चारचाकीला कापून गाडीतील मृतदेह बाहेर काढले.

uttar pradesh pratapgarh road accident
लग्नावरुन येत असणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये एका अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. हे सर्व लोक एका लग्नसमारंभाहून परतत होते. यावेळी भरधाव चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लग्नावरून परतत होते..

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक शेखपूर गावातील एका लग्नसमारंभाला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता, की कित्येकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सात तरुण आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गॅस कटरच्या सहाय्याने चारचाकीला कापून गाडीतील मृतदेह बाहेर काढले. संपूर्ण कारवाई करण्यासाठी पोलिसांना दोन तासांहून अधिक कालावधी लागला. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना

सर्व जण प्रतापगढचे..

मृतांमधील १२ लोक प्रतापगढच्या कुंडा तालुक्यातील जिगरापुर चौसा गावाचे रहिवासी होते. तर, गाडी चालकासोबत दोन लोक कुंडा भागातील दुसऱ्या एका गावातील रहिवासी आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : रेल्वेवर चढून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 15 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Last Updated : Nov 20, 2020, 8:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.