लखनौ - उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली. या वायूमुळे तीन पुरुष, तीन लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
उत्तरप्रदेश: कारखान्यात विषारी वायुगळतीमुळे ३ बालकांसह सात जणांचा मृत्यू - जलालपूर गॅस गळती उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या गॅस गळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली.
![उत्तरप्रदेश: कारखान्यात विषारी वायुगळतीमुळे ३ बालकांसह सात जणांचा मृत्यू gas leakage in factory](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5976741-1009-5976741-1580971738903.jpg?imwidth=3840)
लखनौ - उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली. या वायूमुळे तीन पुरुष, तीन लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
उत्तरप्रदेश: कारखान्यात गॅस गळतीमुळे ३ बालकांसह सात जणांचा मृत्यू
लखनौ - उत्तरप्रदेशातील सितापूर जिल्ह्यातील एका कारखाण्यात झालेल्या गॅस गळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली. विषारी वायूमुळे तीन पुरुष, तीन लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
आज(गुरवारी) सकाळी जेव्हा कामगार कारखान्यात आले तेव्हा त्यांना गॅस गळती झाल्याचे लक्षात आले. विषारी गॅसमुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला होता. तसेच तीन श्वानांचाही विषारी गॅसमुळे मृत्यू झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर तत्काळ पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाला माहिती देण्यात आली. मदत पथकाने बचाव कार्य हाती घेतले आहे.