लखनऊ - उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये तब्बल २८ मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरचा चाट खाल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याकडेला असलेल्या गाड्यावरून चाट खाल्ल्यानंतर या मुलांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच, डॉक्टरांचे एक पथक तातडीने गावामध्ये पोहोचले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी या मुलांना फूड पॉयझनिंग झाल्याचे सांगितले.
या २८ पैकी तीन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच, अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने त्या चाटचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : कोरोना लॉकडाऊन काळातही पिझ्झा डिलीवरी करणारे पिझ्झा शॉप!