ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संकटात अमेरिका करणार ३.६ दशलक्ष डॉलर्सची मदत!

author img

By

Published : May 12, 2020, 11:17 PM IST

अमेरिकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या मदतीचा पहिला टप्पा हा भारतामध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. यासोबतच, या निधीमधून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्रांचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण शोधण्यास मदत होईल, आणि स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणांवरील ताणही हलका होण्यास मदत होईल.

US to give $3.6 million aid to India for Covid-19 battle
देशातील कोरोना संकटात अमेरिका करणार ३.६ दशलक्ष डॉलर्सची मदत!

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी अमेरिका भारताच्या मदतीला धावली आहे. अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) देशाला ३.६ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्यात येणार आहे. अमेरिका सरकारने याबाबत माहिती दिली.

अमेरिकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या मदतीचा पहिला टप्पा हा भारतामध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. यासोबतच, या निधीमधून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्रांचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण शोधण्यास मदत होईल, आणि स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणांवरील ताणही हलका होण्यास मदत होईल.

सीडीसी हे देशातील स्थानिक आरोग्य संस्थांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने काम करेल. जेणेकरून केवळ कोरोनाच नाही, तर भविष्यातील अशा प्रकारच्या आजारांना तोंड देण्यासाठी आपल्या स्थानिक वैद्यकीय यंत्रणा सज्ज असतील. यासोबतच देशात आपत्कालीन ऑपरेशन केंद्रांची स्थापना करण्याकडेही सीडीसी लक्ष देईल. तसेच, सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईमध्ये आवश्यक ते तांत्रिक सहाय्य देण्याची तरतूदही सीडीसीच्या योजनेमध्ये केली आहे.

जानेवारीच्या सुरुवातीपासूनच केंद्रसरकार हे विविध संस्थांच्या संपर्कात होते, ज्या कोरोनाच्या या लढाईमध्ये भारताची मदत करु शकतील.

अमेरिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यूएसएआयडी, सीडीसी, आरोग्य आणि मानव सेवा विभाग अशा अमेरिकेतील विविध विभागांनी मिळून, गेल्या २० वर्षांमध्ये भारताला एकूण २.८ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. यांपैकी १.४ अब्ज डॉलर्स ही वैद्यकीय मदत होती.

हेही वाचा : 'कोरोनाग्रस्तांचा आकडा का वाढला? हे मला नाही चीनला विचारा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.