ETV Bharat / bharat

CAA हिंसाचार: दिल्लीतील अमेरिकन, फ्रान्स, रशियन नागरिकांना सतर्कतेचा इशारा - north delhi violence

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून दिल्लीमध्ये हिंंसाचाराच्या घटना घडल्या. २७ नागरिकांचा या हिंसाचारात बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिका, फ्रान्स आणि रशियाने आपआपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

CAA हिंसाचार
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 27, 2020, 8:22 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २७ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेने दिल्लीतील आपआपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राजधानीच्या ईशान्य भागाला हिंसाचाराचा सर्वात जास्त फटका बसला.

दिल्लीतील अमेरिकेच्या दुतावासाने अमेरिकेच्या नागरिकांना हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. ज्या भागामध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे, त्या भागात जाणे टाळावे, असे नागरिकांना सांगण्यात आले आहे. रशिया आणि फ्रान्सनेही आपल्या नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे. यासंबधी तिन्ही देशांनी नागरिकांसाठी अ‌ॅडव्हायजरी जारी केली आहे.

कशी पसरली हिंसा?

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्लीमध्ये मागील ३ दिवस हिंसक आंदोलन पेटले होते. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेला दिल्लीत हिंसाचार पसरला होता. साध्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसक आंदोलनात झाले. आंदोलकांनी घरे,दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आगी लावल्या, तसेच तोडफोडही केली.

अनियंत्रित नागरिकांचे टोळके काठ्या, दांडके घेवून रस्त्यावंरून फिरत होते. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंदोलकांमना नियंत्रणात आणताताना एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दोनशेपेक्षा जास्त नागरिकही जखमी झाले आहेत. नागरिक भीतीने घरांमध्ये कड्या लावून बसले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात धुराचे लोट उठले होते. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

सरकारी यंत्रणांची हालचाल?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर दिल्लीची परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी काल ट्विट करत नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.