हैदराबाद - अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोव्हीड -19 च्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि क्लोरोक्विनच्या दुष्परिणामांविषयी दुष्परिणामांबद्दल ड्रग सेफ्टी कम्युनिकेशन जारी केले आहे. त्यानुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन सल्फेटसारखी औषधे एफडीए-मान्यताप्राप्त असून त्या मलेरियासारख्या आजारांवरील उपचारासाठी उपयोगात आणल्या जातात. त्याचप्रकारे या औषधीला ल्युपस आणि संधिवातासारख्या आजारावरील उपचारासाठीदेखील एफडीएकडून मान्यता आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या रुग्णावरील उपचारासाठी या औषधीचा वापर करण्यास एफडीएकडून परवानगी किंवा मान्यता नाही.
याबाबत माहिती देताना, एफडीएचे आयुक्त स्टीफन एम. हॅन म्हणाले, 'आम्ही आमच्या रुग्णासाठी शक्य ती उपचार पद्धती शोधत आहोत. तसेच त्यांना योग्य त्या सुविधा प्रदान करत आहोत आणि त्यांच्या आरोग्यानुसार जी कुठली औषधी त्यांच्यावर उपायकारक ठरेल याबाबत आम्ही आवश्यक ती माहिती घेऊन त्यानुसार उपचार करण्याचा निर्णय घेऊ.' दरम्यान, कोरोनावरील उपचारासाठी या औषधींचा वापर करण्याआधी आम्ही, त्या औषधाच्या काही वैद्यकीय चाचण्या करुन घेतल्या. तेव्हा या औषधींच्या काही दुष्परिणामदेखील निदर्शनास आले. त्यानुसारच ही औषधी कोरोनावरील उपचारासाठी सुरक्षित किंवा योग्य नसल्याचे आम्ही निश्चित करणार आहोत.
या औषधीच्या परिणामांबाबत अद्याप चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यानुसार, रुग्णावर या औषधीचा फायदा होईल किंवा नाही ठरविले जाईल. मात्र, जर एफडीएने हे औषध मंजूर केले तर, वैद्यकीय स्टाफ हा साधारणपणे सर्वांना या औषधींचे वापराबाबत प्रिस्क्रीप्शन लिहून देतील किंवा औषधोपचार करतील. त्यामुळे यातून रुग्ण बरा होऊन शकतो किंवा त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे याचे मूल्यांकन करून होणारे परिणाम टाळण्यासाठी या औषधीची सुरक्षा आणि परिणाबाबत एफडीएने याला मान्यता दिली नसावी, असे ते म्हणाले.
आरोग्य सेवा प्रदात्यांना याच्या वापरामुळे गंभीर आणि संभाव्य जीवघेणा हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे औषधे देताना त्यातील मान्यताप्राप्त वापरासाठी औषधाच्या लेबलमध्ये समाविष्ट असलेल्या ड्रग्जबद्दल खात्री घेणे गरजेचे आहे. एफडीए ही अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवेसाठी एक महत्वपूर्ण एजन्सी आहे. ती नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आणि सुरक्षित असणाऱ्या मानवी, पशुवैद्यकीय औषधी, लस आणि मानवी वापरासाठी इतर जैविक उत्पादनांसह वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा आणि प्रभावीपणा यांचे आश्वासन देऊन सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करते.