ETV Bharat / bharat

कोविड-19: अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही जास्त!

author img

By

Published : Apr 1, 2020, 12:50 PM IST

अमेरिकेत कोरोनाची लागण होऊन मृत झालेल्यांचा आकडा ४ हजारांवर पोहचला आहे. ही संख्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांपेक्षाही जास्त आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या 'कोरोना विषाणू संशोधन विभागाने' याबाबत माहिती दिली.

COVID-19
कोविड-19

न्यूयॉर्क - चीन आणि इटली पाठोपाठ कोरोना विषाणूने अमेरिकेतही धुमाकूळ घातला आहे. आजपर्यंत अमेरिकेत कोरोनाची लागण होऊन मृत झालेल्यांचा आकडा ४ हजारांवर पोहचला आहे. ही संख्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांपेक्षाही जास्त आहे. आरोग्य तज्ञांच्या मते परिस्थिती अशीच राहिल्यास कोरोनामुळे अमेरिकेतील साधारण एक ते दोन लाख नागरिकांचा बळी जाऊ शकतो.

सध्या जवळपास १ लाख ९० हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजारांचा मृत्यू झाला आहे. अल कायदाने केलेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ३ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. कोरोनाच्या बळींचा आकडा यापेक्षाही जास्त आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या 'कोरोना विषाणू संशोधन विभागाने' दिली.

कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये आत्तापर्यंत ३ हजार ३१० लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात एकूण ८ लाख ६० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ४२ हजार मृत्यू झाले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी नागरिकांना संबोधित केले. आगामी दोन आठवडे प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत खडतर काळ असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून लवकरच उपाय मिळेल, तोपर्यंत सर्वांना संयम ठेवावा लागेल, असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.

व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या अभ्यासानुसार अमेरिकेतील मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या तरी 'सोशल डिस्टन्सिंग' हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर मोठा परिणाम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.