ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या कथित मारहाणीनंतर महिलेची आत्महत्या - 22 वर्षीय महिलेची आत्महत्या

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर निशुला घरी सोडण्यात आले. पोलिसांनी तिला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबातील व्यक्तींनी केला. पोलिसांनी निशुचा मानसिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.प

Woman commit suicide by hanging
उत्तरप्रदेशात महिलेची आत्महत्या
author img

By

Published : Aug 10, 2020, 2:03 PM IST

जलाऊन( उत्तर प्रदेश)- निशु चौधरी या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील जलाऊन जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणी नंतर तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबातील व्यक्तींनी केला. महिलेने घरामध्ये गळफास लावून घेतल्याचे समोर आल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

निशु चौधरी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, निशु शुक्रवारी बालडू चौकात खरेदीसाठी गेली होती. तेथे काही वस्तू चोरल्याच्या आरोपावरुन दुकानदाराने कोटवली पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर निशुला घरी सोडण्यात आले. पोलिसांनी तिला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबातील व्यक्तींनी केला. पोलिसांनी निशुचा मानसिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

शनिवारी एकदा पोलिसांनी चौकशीसाठी निशु चौधरीला बोलावले होते. यावेळी तिला मानसिक त्रास सहन करावा लागला, असे कुटूंबियांचे म्हणणे आहे. निशुच्या आत्महत्येनंतर तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जात गोंधळ घातला. संबधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.यानंतर मुख्याधिकारी संतोष कुमार यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.