ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमुळे उपचाराअभावी 'टीबी'च्या रुग्णाचा मृत्यू; मुलींनी पार पाडले अंत्यविधी.. - लॉकडाऊन टीबी मृत्यू

संजयला सहा महिन्यांपूर्वी क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या उपचारांसाठी तो जिल्हा रुग्णालयात जात असे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाता आले नाही. त्यामुळे उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती संजयच्या एका नातेवाईकाने दिली.

UP: TB patient dies due to lack of treatment amid lockdown; daughters perform last rites
लॉकडाऊनमुळे उपचाराअभावी 'टीबी'च्या रुग्णाचा मृत्यू; मुलींनी पार पाडले अंत्यविधी..
author img

By

Published : Apr 5, 2020, 4:04 PM IST

लखनऊ - संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना, उत्तर प्रदेशमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अलीगडमधील एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर वेळेत उपचार झाले असते, तर त्याचा जीव वाचला असता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याच्यावर उपचार होणे शक्य झाले नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णालये सुरू असली, तरी वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे या रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णांना काहीही साधन उपलब्ध नाही असे चित्र दिसत आहे.

लॉकडाऊनमुळे उपचाराअभावी 'टीबी'च्या रुग्णाचा मृत्यू; मुलींनी पार पाडले अंत्यविधी..

उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या संजयला सहा महिन्यांपूर्वी क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या उपचारांसाठी तो जिल्हा रुग्णालयात जात असे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाता आले नाही. त्यामुळे उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती संजयच्या एका नातेवाईकाने दिली.

मुलींनीच पार पाडले अंत्यविधी..

संजयच्या पश्चात त्याच्या पाच मुली आहेत. या मुलींनीच त्याच्यावर अंत्यविधी केले. संजय हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्यामुळे आता या मुलींना स्वतःच स्वतःचे पालन पोषण करावे लागणार आहे.

हेही वाचा : तेलंगाणा पोलीस मुख्यालयात बसवले 'डिसइन्फेक्टंट टनेल'..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.