ETV Bharat / bharat

जालौन प्रशासनने सीमेवर रोखली मजुरांची वाहने, महामार्गावर लांबच लांब रांगा - lockdown

येथे मनीष तिवारी या स्थलांतरित कामगाराशी संवाद साधला असता, त्यांनी आपण महाराष्ट्रातून आल्याची माहिती दिली. 'आम्ही महाराष्ट्रातून निघालो होतो. आम्ही मागील 12 तासांपासून झाशीजवळ थांबून आहोत. आम्हाला राज्यात येण्यासाठी वेगळ्या पासची गरज आहे, हे सांगण्यात आले नव्हते,' असे ते म्हणाले.

जालौन प्रशासनने सीमेवर रोखली मजुरांची वाहने, महामार्गावर लांबच लांब रांगा

author img

By

Published : May 3, 2020, 2:47 PM IST

जालौन (उत्तर प्रदेश) - केंद्र सरकारने काही अटींसह लोक डाऊन शिथिल करत या सर्व मजूर आणि कामगारांना आपापल्या राज्यात घरी जाण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, अनेक कामगार वाहनांसह स्वगृही जाण्यास निघाले आहेत. या वाहनांना झाशी-कानपूर महामार्गावर जालौन जिल्हा प्रशासनाने रोखले आहे. यांना जिल्ह्याची सीमा पार करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महामार्गावर या सर्व मजुरांची शेकडोंच्या संख्येने वाहने थांबली असून येथे चक्काजामसारखी स्थिती झाली आहे.

जालौन प्रशासनने सीमेवर रोखली मजुरांची वाहने, महामार्गावर लांबच लांब रांगा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात जवळजवळ महिन्याभरापासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये परप्रांतीय मजूर आणि कामगार अडकले होते. आता केंद्र सरकारने काही अटींसह लोक डाऊन शिथिल करत या सर्व मजूर आणि कामगारांना आपापल्या राज्यात घरी जाण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, हे सर्वजण रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने निघाले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील जालौन येथे या कामगारांची वाहने लावण्यात आली आहेत. त्यांना पुढे प्रवेश करण्याची परवानगी नाही. शनिवारी रात्री उशिरापासून अनेक मजूर येथे अडकले आहेत. अन्न-पाण्याशिवाय येथे अडकून पडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

सीमेवर पोहोचले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक

विविध प्रांतातून ट्रक आणि स्वतःच्या तसेच इतर खासगी वाहनांनी आलेले सर्व मजूर कामगार महामार्गावरून निघाले असताना त्यांना अचानकपणे जालौनचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमेवर रोखले. त्यांनी येथून कोणतेही वाहन पुढे जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात राहतील, असा पवित्रा घेतला. त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. रात्रीच्या आठ वाजल्यापासून शेकडोंच्या संख्येने मजूर वाहनांसह येथे अडकले आहेत. यांची संख्या सुमारे चार ते पाच हजार असून इतक्या वेळापासून काहीही खायला-प्यायला न मिळाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शिवाय एकाच ठिकाणी इतक्या प्रमाणात लोक जमा झाल्यामुळे कोरोना विषाणू प्रसाराचा धोकाही वाढला आहे.

येथे मनीष तिवारी या स्थलांतरित कामगाराशी संवाद साधला असता, त्यांनी आपण महाराष्ट्रातून आल्याची माहिती दिली. 'आम्ही महाराष्ट्रातून निघालो होतो. आम्ही मागील 12 तासांपासून झाशीजवळ थांबून आहोत. आम्हाला राज्यात येण्यासाठी वेगळ्या पासची गरज आहे, हे सांगण्यात आले नव्हते,' असे ते म्हणाले.

आणखी एक मजूर पंकज दुबे यांनी आपण गुजरातमधील सुरत येथून आल्याचे सांगितले. 'आम्हाला अयोध्येला जायचे आहे. याआधी आम्हाला मध्यप्रदेशच्या सीमेवर थांबवण्यात आले होते. तेथेही आम्हाला पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत थांबवण्यात आले. आता आम्हाला झाशी येथे पुन्हा रोखण्यात आले आहे. आमच्याजवळ पाणी किंवा अन्नपदार्थ नसल्यामुळे सर्वजण भुकेले आहेत. आता आम्हाला येथून परत जाण्यास सांगण्यात येत आहे,' असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.