ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशात सगळीकडे जंगलराज पसरलंय, अत्याचाराच्या घटनांवरून काँग्रेस नेते आक्रमक - राहुल गांधी हाथरस बलात्कार बातमी

उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनांवरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला घेरले आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:40 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात सगळीकडे जंगलराज पसरले असून त्यास कोणतीही सीमा राहिली नाही. सरकारला जाब विचारण्याची हीच योग्य वेळ आहे, असा हल्ला काँग्रेसने योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे. हाथरस बलात्काराची घटना ताजी असतानाच राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातही दलित तरुणीच्या बलात्कारनंतरही वातावरण पेटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

  • UP के जंगलराज में बेटियों पर ज़ुल्म और सरकार की सीनाज़ोरी जारी है।

    कभी जीते-जी सम्मान नहीं दिया और अंतिम संस्कार की गरिमा भी छीन ली।

    भाजपा का नारा ‘बेटी बचाओ’ नहीं, ‘तथ्य छुपाओ, सत्ता बचाओ’ है।#BalrampurHorror

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • हाथरस जैसी वीभत्स घटना बलरामपुर में घटी। लड़की का बलात्कार कर पैर और कमर तोड़ दी गई। आजमगढ़, बागपत, बुलंदशहर में बच्चियों से दरिंदगी हुई।

    यूपी में फैले जंगलराज की हद नहीं। मार्केटिंग, भाषणों से कानून व्यवस्था नहीं चलती। ये मुख्यमंत्री की जवाबदेही का वक्त है। जनता को जवाब चाहिए।

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हाथरस बलात्काराच्या घटनेवरून देशात वादळ उठलेले असताना बलरामपूर जिल्ह्यातही एका २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला, त्यावर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. आझमगढ, बागपेठ, बुलंदेश्वर येथे महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे प्रियांका गांधींनी ट्विट केले आहे. आज (गुरुवार) काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरस येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अडविले आहे. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली.

'पोलिसांनी मला धक्का दिला आणि माझ्यावर लाठीचार्ज केला. या देशात फक्त मोदीच पायी चालू शकतात का? सामान्य नागरिक पायी चालू शकत नाही का? असा सवाल राहुल गांधींनी केला. आमच्या गाड्या थांबवण्यात आल्यानंतर आम्ही पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला', असे ते म्हणाले.

'उत्तर प्रदेशात मुलींवर अत्याचार होत आहेत. तर सरकार अरेरावीची भाषा करत आहे. जिवंत असताना कधी महिलांना सरकारने सन्मान दिला नाही. मात्र, अंत्यसंस्कारही कुटुंबीयांना करू दिला नाही. 'बेटी बचाओ नाही, तर सत्य छुपाओ सत्ता बचाओ' हा भाजपाचा नारा असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.