ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशची समूह संक्रमणाच्या दिशेने वाटचाल, राज्य आरोग्य सचिवांचा इशारा

सध्या भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकडा 1 हजार 397 वर पोहोचला आहे. तर, 35 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे रुग्ण वाढल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश
author img

By

Published : Apr 1, 2020, 3:03 PM IST

लखनऊ - 'उत्तर प्रदेशातील कोविद 19 रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. राज्य समूह संक्रमणाच्या दिशेने निघाले आहे,' असा इशारा राज्य आरोग्य सचिव अमित मोहन यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'राज्यात COVID-19 चे 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 14 जण बरे झाले आहेत. यातील बहुतेक रुग्ण गौतम बुद्ध नगर आणि मीरत येथील आहेत. पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या आपण समूह संक्रमणाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या टप्प्यात आहोत,' असे अमित मोहन म्हणाले.

'कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या एका अधिकार्‍याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, असे ते म्हणाले. सध्या उत्तर प्रदेशात आठ प्रयोगशाळांमध्ये COVID-19 चाचणी केली जात आहे. झाशी, लखनऊ येथे COVID-19 च्या चाचणीसाठी प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, लवकरच प्रयागराज येथेही चाचणीसाठी प्रयोगशाळा बांधण्यात येतील,' असे ते पुढे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.