लखनऊ- कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्वीट करुन आग्रामधील कोरोना रुग्णाच्या आकडेवारीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनतर आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधी यांना नोटीस बजावली. त्यांनतर नोटीसचे उत्तर प्रियंका गांधी यांनी द्यावे अन्यथा कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी प्रियंका गांधींवर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राजकारण केल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशातमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर कॉंग्रेसने यात राजकारण करायला सुरूवात केली आहे. कोविडमुळे आग्रामधील कोरोना रुग्णांचा आकडा लपवल्याचा काॅंग्रसने आरोप केला आहे. हा आरोप फेटाळून लावत आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधी यांना नोटीस बजावली आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रियंका गांधींनी उत्तर द्यावे असे सांगितले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.