गोरखपूर - शारदीय नवरात्रीच्या नवमीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कन्या पूजन केले. या दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी मुलींच्या पायांना टिळक लावले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवरात्रीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी नवरात्रोत्सवात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले.
विजयदशमीचा सण सत्य, न्याय आणि धर्म यांच्या विजयाचे प्रतीक आहे. विजयादशमीचा सण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व न्यायाचे मार्गदर्शन करणार्या व्यक्तीला नेहमीच प्रेरणा देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जात, धर्म यांना रामराज्यात स्थान नाही. सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. विजयादशमी हा सण जीवनात आनंद, समृद्धी आणतो परंतु उत्साहाने देहभान गमावण्याची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे आवश्यक आहे, असे योगी आदित्यानाथ म्हणाले.