ETV Bharat / bharat

आपल्याच सरकारविरोधात भाजप आमदारांचे आंदोलन; विरोधकही झाले सहभागी - उत्तर प्रदेश भाजप

उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये काल एक विशेष घटना पहायला मिळाली. राज्य विधानसभेमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी न दिल्यामुळे, भाजपच्या नंद किशोर गुर्जर यांनी आपल्याच पक्षाविरोधात आंदोलन सुरु केले. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनीदेखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

उत्तर प्रदेश विधानसभा आंदोलन
आपल्याच सरकारविरोधात भाजप आमदारांचे आंदोलन; विरोधकही झाले सहभागी
author img

By

Published : Dec 18, 2019, 8:25 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये मंगळवारी एक विशेष घटना पहायला मिळाली. भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांनी काही सहकारी आमदारांसोबत मिळून आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनीदेखील या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. राज्य विधानसभेमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरु केले होते.

आपल्याच सरकारविरोधात भाजप आमदारांचे आंदोलन; विरोधकही झाले सहभागी

मिळालेल्या माहितीनुसार, गुर्जर हे आपल्या मतदारसंघातील काही अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत विधानसभेमध्ये बोलणार होते. त्यावेळी सभापतींनी त्यांना याबाबत बोलण्यास मनाई केली. त्यानंतर गुर्जर यांनी आपल्याच पक्षाविरोधात आंदोलन सुरु केले. विशेष म्हणजे, भाजपच्या ७० आमदारांनी गुज्जर यांना पाठिंबा देत आंदोलन सुरु केले. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे साधारणपणे १५० आमदार हे गुर्जर यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत होते.

त्यानंतर जेव्हा समाजवादी पक्षाचे आमदारही गुर्जर यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले, तेव्हा सभापतींनी विधानसभेचे त्या दिवशीचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर संध्याकाळी भाजप आमदारांनी विधानसभेच्या लॉबी भागामध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. तसेच, विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतरही, दोन्ही बाजूंचे काही आमदार आपल्या जागांवरती बसून राहिले.

आश्वासनानंतर आंदोलन मागे..

सभापती हृदय नारायण दिक्षित यांनी आमदारांशी बोलून, या मुद्यावर आज (बुधवार) सभागृहात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, आजही यावर काही तोडगा निघाला नाही, तर आपण पुन्हा आंदोलन करू असा इशाराही या आमदारांनी दिला.

दरम्यान, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी भाजपने वरिष्ठ आमदारांची एक समिती नेमली आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका

१६९ आमदार पक्षाविरोधात असल्यामुळे भाजप आता अल्पमतात - विरोधी पक्षनेते

समाजवादी पक्षाचे आमदार आणि उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी भाजप आता अल्पमतात असल्याची टीका केली. भाजपचे १६९ आमदार हे स्वतःच्या पक्षाविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की देशातील कोणत्याही राज्याच्या विधानसभेमध्ये असा प्रकार याआधी झाला नव्हता. मात्र आता आपल्याच पक्षाचे एवढे आमदार आपल्या विरोधात आहेत, हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. योगी सरकारला आता सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही.

विधानसभेसाठी हा काळा दिवस - काँग्रेस नेत्या

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आराधना मिश्रा मोना यांनी विधानसभेसाठी हा काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. असे पहिल्यांदाच झाले असावे, की सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच आपले म्हणणे मांडण्यापासून रोखण्यात आले. या घटनेमुळे हेच सिद्ध झाले आहे, की सत्तेचा माज चढलेले योगी सरकार हे ना लोकांचे म्हणणे ऐकत आहे, ना शेतकऱ्यांचे आणि ना आपल्या स्वतःच्या आमदारांचे, असे मत त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा निर्णय 20 डिसेंबरला

Intro:Body:

Gurjar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.