ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेश: उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन,  ५०० पेक्षा जास्त शेकऱ्यांवर गुन्हे दाखल - land Acquisition issue news

उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. 'गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्पाचा' योग्य मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आज(रविवारी) आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी विद्युत सब-स्टेशनच्या आवारातील पाईप पेटवून दिले.

आग विझवताना अग्निशमन दल
author img

By

Published : Nov 17, 2019, 1:29 PM IST

लखनऊ - उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. 'गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्पाचा' योग्य मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आज(रविवारी) आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी विद्युत सब-स्टेशनच्या आवारातील पाईप पेटवून दिले. त्यामुळे भीषण आग पसरली आहे. आग विझवण्यासाठी आग्निशमन दलाची तारंबळ उडाली आहे.

आग विझवताना अग्निशमन दल
उत्तरप्रदेश औद्यौगिक विकास महामंडळाने गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण केली आहे. मात्र, जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावरुन शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आत्तापर्यंत ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि आग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काल शनिवारीही शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. याप्रकरणी दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसा पसरवणाऱ्या शेतकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.पोलीस आणि उत्तरप्रदेश औद्यौगिक विकास महामंडळावर केलेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे उन्नावचे पोलीस अधिक्षक माधव प्रसाद शर्मा यांनी सांगितले. तसेच हिंसा पसरवणाऱ्या शेतकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

उत्तरप्रदेश: उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन,  ५०० पेक्षा जास्त शेकऱ्यांवर गुन्हे दाखल

लखनऊ - उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. 'गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्पाचा' योग्य मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आज(रविवारी) आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी विद्युत सब-स्टेशनच्या आवारातील पाईप पेटवून दिले. त्यामुळे भीषण आग पसरली आहे. आग विझवण्यासाठी आग्निशमन दलाची तारंबळ उडाली आहे.

उत्तरप्रदेश औद्यौगिक विकास महामंडळाने गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण केली आहे. मात्र, जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावरुन शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आत्तापर्यंत ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  

पोलीस आणि आग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काल शनिवारीही शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. याप्रकरणी दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसा पसरवणाऱ्या  शेतकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

पोलीस आणि उत्तरप्रदेश औद्यौगिक विकास महामंडळावर केलेल्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे उन्नावचे पोलीस अधिक्षक माधव प्रसाद शर्मा यांनी सांगितले. तसेच हिंसा पसरवणाऱ्या शेतकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.