ETV Bharat / bharat

उन्नाव प्रकरण: माजी आमदार कुलदिप सिंह सेनगरच्या शिक्षेवर आज निकाल - उन्नाव बलात्कार

जिल्हा न्यायाधीश धर्मेंद्र प्रधान यांनी १३ मार्चला निकाल देणार असल्याचा आदेश याआधी दिला होता. सातही दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनी केली आहे.

कुलदिप सिंह सेनगर
कुलदिप सिंह सेनगर
author img

By

Published : Mar 13, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर पीडितेच्या वडिलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालय निकाल देणार आहे. पोलिसांनी ७ जणांना हत्या प्रकरणी दोषी ठरवले आहे.

जिल्हा न्यायाधीश धर्मेंद्र प्रधान यांनी १३ मार्चला निकाल देणार असल्याचा आदेश याआधी दिला होता. सातही दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनी केली आहे. पीडितेच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ साली तुरुंगात असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने सेनगरसह ७ जण दोषी असल्याचा निर्णय दिला आहे. आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

४ जून २०१७ ला पीडितेने सेनगरवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर कुलदीप सेनगरचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितेच्या वडिलांना जबर मारहाण केली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. बलात्कार प्रकणार कुलदीप सेनगरला याआधीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तसेच १० लाख रुपये पीडितेला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.