ETV Bharat / bharat

उन्नाव प्रकरणातील आरोपी सेंगरची उच्च न्यायालयात धाव..

उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाला त्याने आव्हान दिले आहे.

Unnao rape case convict reaches to delhi high court challenging his conviction
BREAKING : उन्नाव प्रकरणातील आरोपी सेंगरने घेतली उच्च न्यायालयात धाव..
author img

By

Published : Jan 15, 2020, 4:41 PM IST

Updated : Jan 15, 2020, 6:15 PM IST

नवी दिल्ली - उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने त्याला याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयाला आणि त्याला देण्यात आलेल्या शिक्षेला त्याने आव्हान दिले आहे.

  • Unnao rape case: Expelled BJP MLA Kuldeep Singh Sengar has approached Delhi High Court challenging his conviction by the trial court. He has also challenged the Court's judgement which awarded him life imprisonment. pic.twitter.com/lup22S7sZd

    — ANI (@ANI) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२०१७ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर हा मुख्य आरोपी होता. सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. याप्रकरणी आरोप दाखल झाल्यानंतर भाजप आमदार असलेल्या सेंगरला पक्षातून निलंबीत करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण ?

जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती.

हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला होता. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने निकाल देत, कुलदीप सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. तसेच, पीडीतेला नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रूपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा : निर्भया प्रकरण: 'डेथ वॉरंट'ला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

Intro:Body:

BREAKING : उन्नाव प्रकरणातील आरोपी सेंगरने घेतली उच्च न्यायालयात धाव..

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाला त्याने आव्हान दिले आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.