ETV Bharat / bharat

उन्नाव: भररस्त्यात जाळलेल्या 'त्या' बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू...!

पीडिता दोन दिवसांपूर्वी न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात होती. त्यावेळी गावाबाहेर बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर आलेल्या आरोपींसह 5 जणांनी तरुणीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. यात ती 90 टक्के भाजली होती.

unnao-molestation-victim-died-in-delhi
उन्नाव पीडितेचा मृत्यू
author img

By

Published : Dec 7, 2019, 1:54 AM IST

Updated : Dec 7, 2019, 6:59 AM IST

उन्नाव - उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात पेटवून दिलेल्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. जामीनावर सुटून आलेल्या आरोपींनी दोन दिवासांपूर्वी रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती 90 टक्क्यांपेक्षा जास्त भाजली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला आहे.

उन्नावमध्ये काही महिन्यांपूर्वी या तरुणीने दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. हे आरोपी काही दिवासांपूर्वी जामीनावर सुटून बाहेर आले होते. त्याच रागातून त्या दोन आरोपींसह 5 जणांनी दोन दिवसांपूर्वी पीडितेला रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पीडिता 90 टक्के भाजली होती. उपचारासाठी तिला तत्काळ लखनौ येथे हलवण्यात आले होते. या प्रकरणाने देशभर खळबळ उडाल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. पीडितेला उपचारासाठी विमानाद्वारे तत्काळ दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गुरूवारी रात्री 11.40 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुभम त्रिवेदी, शिवम त्रिवेदी, हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर वाजपेयी आणि उमेश वाजपेयी अशी आरोपींची नावे आहेत.

Intro:Body:

unnav

Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.