नवी दिल्ली - रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (वय ६५) यांचे आज निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ११ सप्टेंबरला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कर्नाटकच्या बेळगाव मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
एम्समध्ये वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ्जांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली, उपचार सुरू असताना ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. भाजपसह काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, जयराम रमेश यांनी ट्विट करून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. 'तुमचे हास्य नेहमी आठवणीत राहील, ही बातमी ऐकून खूपच दु:ख झाले.' असे ट्विट रमेश यांनी केले आहे.
-
I remember the ever smiling Angadi-ji. Very pained at hearing this sad news. https://t.co/BtZ2bUXmqe
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I remember the ever smiling Angadi-ji. Very pained at hearing this sad news. https://t.co/BtZ2bUXmqe
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 23, 2020I remember the ever smiling Angadi-ji. Very pained at hearing this sad news. https://t.co/BtZ2bUXmqe
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 23, 2020
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करून त्याबाबत माहिती दिली होती आणि आपल्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्यास सांगितले होते. बेळगाव मतदारसंघातून सुरेश अंगडी चारवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बेळगावतील कोप्प्या गावात जन्मलेल्या सुरेश अंगडी यांनी जिल्ह्यातील राजा लखमगौदा विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील गृहमंत्री अमित शाह, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नायक, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, संसदीय कामकाज मंत्रालय अर्जुन राम मेघवाल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाची लागण झाली आहे.
-
Deeply saddened to hear about the untimely demise of Sh Suresh Angadi, MoS Railways who succumbed to COVID. Heartfelt condolences to his family. I pray to Almighty that his soul rests in peace.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deeply saddened to hear about the untimely demise of Sh Suresh Angadi, MoS Railways who succumbed to COVID. Heartfelt condolences to his family. I pray to Almighty that his soul rests in peace.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) September 23, 2020Deeply saddened to hear about the untimely demise of Sh Suresh Angadi, MoS Railways who succumbed to COVID. Heartfelt condolences to his family. I pray to Almighty that his soul rests in peace.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) September 23, 2020
काही दिवसांपूर्वी मंत्री अंगडी यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली होती. त्यांची मुलाखत पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - #लॉकडाऊन भारत : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची विशेष मुलाखत