नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वामित्व योजनेच्या शुभारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांचे आभार मानले. ग्रामीण भारताला संपन्न आणि समृद्ध बनवण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस रात्र काम करत आहेत. त्याच्या द्वारे उद्घाटन करण्यात आलेली स्वामित्व योजना ग्रामीण स्वराजच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
नानाजी देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामित्व योजनेचा शुभारंभ त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असेही शाह म्हणाले. मोदींच्या माध्यमातून गरीब आणि ग्रामीणांना सक्षम बनवणेच आत्मनिर्भर भारताचे खरे लक्ष्य आहे. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील जमिनीच्या मालकांना रिकॉर्ड ऑफ राईट्सचा हक्क मिळेल असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी यांनी रविवारी स्वामित्व योजनेंतर्गत संपत्ती कार्डचे वितरण केले. स्वामित्व योजना ही पंचायत राज मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावर्षी 14 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या निमित्ताने या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण क्षेत्रातील लोकांना त्यांचा अधिकार आणि सम्मान देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. आता त्यांना सोप्या पद्धतीने बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळेल. तसेच यामुळे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतील.
ही योजना 2020 ते 2024 या चार वर्षांच्या कालावधीत देशात लागू करण्यात येणार आहे. याअंतर्गत जवळपास 6.62 लाख गावांचा समावेश होणार आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमधील जवळपास १ लाख गावे आणि पंजाब, राजस्थानमध्ये सतत ऑपरेटिंग सिस्टम (सीओआरएस) स्थानकांचे नेटवर्क सुरू करण्याचे काम पायलट फेजमध्ये करण्यात येणार आहे.