ETV Bharat / bharat

'बेरोजगारी हा राजकीय मुद्दा नाही, तर मानवतावादी विषय' - बेरोजगारी

प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील 2016मध्ये शिक्षक भरतीची परीक्षा दिलेल्या 50 युवकांसोबत चर्चा केली. बेरोजगारी ही एक राजकीय मुद्दा नसून मानवतावादी प्रश्न आहे, असे यावेळी म्हणाल्या. तसेच यासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रियांका
प्रियांका
author img

By

Published : Sep 17, 2020, 5:05 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील 2016मध्ये शिक्षक भरतीची परीक्षा दिलेल्या 50 युवकांसोबत चर्चा केली. बेरोजगारी ही एक राजकीय मुद्दा नसून मानवतावादी प्रश्न आहे, असे यावेळी म्हणाल्या. तसेच यासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रियांका गांधींशी संवाद साधताना, एका महिला परीक्षार्थीने आपल्या व्यथा मांडल्या. 2016मध्ये परिक्षा दिल्यानंतर निवड झाली होती. त्यानंतर खूप आनंद झाला. मात्र, आजतागायत माझी नियुक्ती करण्यात आली नाही. मला दोन लहान मुले आहेत. घराची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मुलांवर 10 रुपये खर्च करण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो, असे महिला परीक्षार्थीने प्रियांका गांधींना सांगितले. यावेळी प्रियांका गांधींनी त्यांना मदत करण्याचे आश्वानस दिले आहे. तसेच बेरोजगारी हा राजकीय मुद्दा नाही, तर मानवतावादी विषय असून न्यायाचा प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. तसेच 5 वर्षीय करार कायदा हा एक काळा कायदा आहे. युवकांच्या भरतीवर टाळेबंदी करणे हा अन्याय आहे. याविरोधात युवक आपले प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यांवर उतरत आहेत. तर त्यांचे प्रश्न ऐकायला हवेत. त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याने त्यांचा आवाज दबणार नाही, असे त्या टि्वटमध्ये म्हणाल्या.

उत्तर प्रदेशमध्ये गट ख आणि गट ग च्या सरकारी नोकऱ्यांसाठी नवा प्रस्ताव आणण्यात आला आहे. यावरून राज्यात वाद पेटला आहे. कार्मिक विभागाच्या प्रस्तावानुसार, गट ख आणि गट ग च्या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर, पहिल्या पाच वर्षांच्या कराराच्या आधारे कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाईल. या पाच वर्षांत, दर 6 महिन्यांनी कर्मचार्‍यांचे मूल्यांकन केले जाईल. वर्षाच्या अखेरीस 60 टक्के गुण आणणे आवश्यक असेल. या पाच वर्षात त्यांना कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही. नव्या व्यवस्थेअंतर्गत कर्मचार्‍यांची मूलभूत नियुक्ती पाच वर्षानंतरच केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.