लंडन- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन भारतीयांना केले होते. त्याचे अनुकरण ब्रिटनमध्येही करण्यात आले. ब्रिटनने देखील त्यांच्या देशात वैद्यकीय सेवा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'क्लॅप फॉर केअर' उपक्रम राबवला. गुरवारी सांयकाळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी 11 डाऊनिंग स्ट्रीटवर उतरुन वैद्यकीस सेवा देणाऱ्यांप्रती टाळ्या वाजवल्या. हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढणाऱ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना लंडन शहरात टाळ्या,थाळ्यांच्या गजरात अभिवादन करण्यात आले. ब्रिटनमध्ये सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशात 33718 कोरोनाबाधित आहेत तर 2921 जणांचा मृत्यू झाला आहे.
संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी करण्याची क्षमतेमध्ये एका महिन्यात दहा पटीने वाढ करणार असल्याचे ब्रिटनने जाहीर केेले आहे. मात्र, देशावर आलेल्या संकटाच्या परिस्थिती विरोधी राजकीय पक्ष,शास्त्रज्ञ, वर्तमानपत्रांनी जॉनसन यांनी आश्वासन न पाळल्यामुळे टीका केली आहे.