ETV Bharat / bharat

देशातील 'इतकी' विद्यापीठे सापडली बनावट; उत्तर प्रदेश, दिल्लीत मोठी संख्या - विद्यापीठ अनुदान आयोग बातमी

युजीसीकडून आज देशातील बनावट विद्यापीठांची यादी घोषित करण्यात आली असून २४ विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे.

यूजीसी
यूजीसी
author img

By

Published : Oct 7, 2020, 7:07 PM IST

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बुधवारी देशातील २४ स्वतंत्र, अनधिकृत विद्यापीठांची यादी जाहीर केली असून ती सर्व बनावट असल्याचे घोषित केले आहे. यामधील सर्वाधिक विद्यापीठे उत्तर प्रदेशातील असून त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.

विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांच्या माहितीसाठी देशातील २४ विद्यापीठे बनावट असल्याचे घोषित करत आहोत. त्यांना कोणत्याही पदव्या देण्याचा अधिकार नाही. यूजीसी कायद्याचे उल्लंघन केलेल्या विद्यापीठांना बनावट घोषित केल्याचे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले.

यातील सर्वाधिक आठ विद्यापीठे उत्तर प्रदेशची असून त्या खालोखाल दिल्लीतील सात विद्यापीठे आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे आहेत. कर्नाटक, केरळ, पद्दुचेरी आणि महाराष्ट्रात असे प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आहे.

हेही वाचा - 'सार्वजनिक जागेवर ताबा मिळवणे स्वीकारार्ह नाही', शाहीन बागेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.